‘या’ दिग्गज फुटबॉलपटूवर बलात्काराचा आरोप, इन्स्टाग्रामवरून झाली होती मैत्री

‘या’ दिग्गज फुटबॉलपटूवर बलात्काराचा आरोप, इन्स्टाग्रामवरून झाली होती मैत्री

काही दिवसांपूर्वी ब्राझील फुटबॉल संघाचे कर्णधारपद काढून घेतले होते.

  • Share this:

पॅरिस, 02 मे : ब्राझीलचा सुपरस्टार फुटबॉलपटू नेमार ज्युनिअर याच्या चाहत्यांसाठी एक धक्कादायक बातमी आहे. नेमारवर पॅरिसमध्ये एका महिलेने बलात्काराचा आरोप केला आहे, अशी माहिती एका ब्राझीलियन मीडियानं दिली आहे. मात्र नेमारच्या वडिलांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. साओ पाऊलो पोलिसांकडे करण्यात आलेल्या तक्रारीनुसार, नेमारवर पीडित महिलेने सहमतीशिवाय संबंध ठेवल्याचा आरोप केला आहे. रिपोर्टनुसार, ही अज्ञात महिला ब्राझीलची असून इन्स्टाग्रामवर तीची नेमारसोबत मैत्री झाली होती.

चॅट दरम्यान, नेमारनं या महिलेला पॅरिसमध्ये भेटण्याची विनंती केली होती. दरम्यान नेमार नशेत असताना त्या दोघांची हॉटेलमध्ये भेट झाली, या दरम्यान पीडित महिलेच्या सहमतीशिवाय तिच्यावर अत्याचार करण्यात आला होता, असा आरोप या महिलेने केला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वी ब्राझील फुटबॉल संघाचे कर्णधारपद काढून घेतले होते. त्याच्याजागी डानी एल्वेस याला कोपा अमेरिका स्पर्धेसाठी कर्णधारपद दिले आहे.

वडिलांनी घेतली मुलाची बाजू

या सगळ्या प्रकरणात नेमारचे वडिल सांतोस यांनी एक वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीदरम्यान, हे सगळे आरोप खोटे असून माझ्या मुलाने असे काही केलेल नाही. माझ्या मुलाला ब्लॅकमेल केलं जात असल्याची माहिती दिली आहे. आमच्याकडे पुरावे असून, आमचा वकिल यापुढं सगळा पाहणार आहे.

वाचा-World Cup : असा अनफिट कर्णधार पाहिला नाही...शोएब अख्तरनं घेतली पाकिस्तानच्या खेळाडूंची शाळा

वाचा-World Cup : वॉर्नरचं अर्धशतकासह दमदार कमबॅक मात्र प्रेक्षकांनी मैदानावरच केला अपमान

वाचा-World Cup : महामुकाबल्याआधी चाहत्यांची धाकधूक वाढली, विराट कोहली जखमी

VIDEO: मुंबईकरांच्या खिशाला कात्री, टॅक्सीचं भाडं वाढणार, या आणि इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 2, 2019 03:42 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading