लंडन, 03 मे : भारतीय संघ सध्या विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली वर्ल्ड कपमध्ये खेळत आहे. त्यामुळं सध्याच्य घडीला विराट कोहली एवढा फेमस आणि श्रीमंत खेळाडू भारतात सध्या दुसरा कोणी नाही. मात्र सध्या विराटला टक्कर देतोय तो दिग्गज फुटबॉलपटू क्रिस्टियानो रोनाल्डो. एका इंग्रजी वृत्तसंस्थेने दिलेल्या बातमीनुसार रोनाल्डोनं विराटच्या सगळ्या कारच्या किंमतीपेक्षा जास्त असलेली एक कार खरेदी केली आहे. पोर्तुगाल खेळाडू रोनाल्डा हा जगातला सर्वात श्रीमंत आणि प्रसिद्धी असलेला खेळाडू आहे.
रोनाल्डाला असलेले कारची आवड ही त्याच्या आतापर्यंतच्या कार कलेक्शनकडून बघूनच कळते. यातच आता त्याने 6.6 कोटी किमतींची मॅकलेरन सेना सुपरकार खरेदी केली आहे. ही कार ब्राझीलचा फॉर्म्युला वन रेसर एर्यटन सेना याच्या नावावर आहे. त्याआधी रोनाल्डोनं 11 कोटींची लग्जरी कार विकत घेतली होती. दरम्यान विराटच्या एकूण कारची संख्या 10 कोटी आहे. हायस्पीड लक्झरी कारचा शौकीन असलेल्या रोनाल्डोकडे आतापर्यंत 19 अधिक सुपरकार आहेत. त्याची सर्वात महागडी गाडी आहे बुगाती वेयरॉन. एका वर्षात 3 कोटी डॉलरपेक्षाही जास्त आहे. त्याच्या सर्वात महागड्या असलेल्या वेयरॉन गाडीची किंमत 11 कोटी आहे.
त्याशिवाय रोनाल्डोकडे लम्बरगिनी, BMW, बेंटले , मर्सिडीज पोर्शे आणि फरारी अशा महागड्या कारही आहेत. तर, भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीची आवडती गाडी ऑडी आहे. याच कारचे चार लक्झरी मॉडेल विराटकडे आहेत. एवढचं नाही तर विराट या गाडीचा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर आहे.
वाचा- World Cup : अशी असेल भारतीय संघाची भगव्या रंगाची जर्सी, फोटो झाले व्हायरल
वाचा- World Cup : विराट कोहलीचा मोठा खुलासा, टीममधला ‘हा’ खेळाडू आहे माझ्या विरोधात
वाचा- World Cup : केएल राहुलच्या अडचणी वाढल्या, चौथ्या क्रमांकाचा ‘हा’ दावेदार झाला फिट
VIDEO : दोन दिवसांत वादळासह पूर्वमोसमी पावसाचा अंदाज, पाहा 'टॉप 18 बातम्या'