Home /News /sport /

Fifa World Cup : फुटबॉलच्या मैदानात रशियाला किक, 2 देशांनी दिला खेळण्यास नकार

Fifa World Cup : फुटबॉलच्या मैदानात रशियाला किक, 2 देशांनी दिला खेळण्यास नकार

Fifa World Cup : रशियाला रोखण्यासाठी वेगवेगळे निर्बंध लावण्याची तयारी अमेरिकेनं सुरू केली आहे. त्याचवेळी फुटबॉलच्या मैदानातही रशियाला किक बसलीय.

    मुंबई, 27 फेब्रुवारी : जागतिक जनमताची पर्वा न करता रशियानं युक्रेनवर हल्ला केला. सध्या दोन्ही देशांमध्ये युद्ध  (Russia- Ukraine War)सुरू आहे.  रशियाला रोखण्यासाठी वेगवेगळे निर्बंध लावण्याची तयारी अमेरिकेनं सुरू केली आहे. त्याचवेळी फुटबॉलच्या मैदानातही रशियाला किक बसलीय. पोलंड आणि स्वीडन या दोन युरोपीयन देशांनी रशिया विरूद्ध वर्ल्ड कप पात्रता फेरीचे सामने (Fifa World Cup 2022) खेळण्यास नकार दिला आहे. रशिया विरूद्ध पोलंड यांच्यात 24 मार्च रोजी मॉस्कोमध्ये पात्रता फेरीतील सेमी फायनल होणार आहे. त्यानंतर 29 मार्च रोजी रशियाची स्वीडन किंवा झेक रिपब्लिक यांच्याशी फायनल मॅच होऊ शकते. या मॅचपूर्वी पोलंड फुटबॉल फेडेशनचे अध्यक्ष (Polish Football Federation) सेजरी कुलेजा यांनी ट्विटवर रशियाशी न खेळण्याची घोषणा केली. या विषयावर फिफातील अन्य सदस्यांनीही एकत्र यावं यासाठी पोलंड प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं. कुलेजा यांच्या निर्णयाचं पोलंडकडून सर्वाधिक गोल करणारा खेळाडू रॉबर्ट लेवांडोवस्की  (Robert Lewandowski) याने स्वागत केले आहे. 'युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरू आहे. मी या परिस्थितीमध्ये रशियाच्या राष्ट्रीय टीमशी फुटबॉल खेळण्याची कल्पनाही करू शकत नाही. ' असे त्याने ट्विट केले आहे. Russia-Ukraine War: रशिया विरूद्ध युद्धात उतरणार बॉक्सिंग चॅम्पियन, विश्वविजेती भावडं लावणार जीवाची बाजी! रशियाचे फुटबॉल खेळाडू आणि फॅन्स यासाठी जबाबदार नाहीत. पण आम्ही देखावा करू शकत नाही, असेही त्याने यावेळी स्पष्ट केले. कतारमध्ये यावर्षी होणाऱ्या फुटबॉल वर्ल्ड कपसाठी या पात्रता फेरीच्या मॅच होत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Football, Russia, Russia Ukraine

    पुढील बातम्या