मुंबई, 23 ऑगस्ट: फुटबॉलच्या मैदानात फॅन्स विरुद्ध खेळाडू आणि अधिकारी यांच्यात जोरदार दंगल झाल्याचा धक्कादायक प्रकार (Chaos breaks out mid-match in Football match)घडला आहे. होम टीमच्या फुटबॉलपटूला बॉटल फेकून मारल्यानंतर हा प्रकार सुरु झाला. त्यानंतर मैदानात दोन गटांमध्ये अक्षरश: मारामारी झाली. या प्रकारानंतर अखेर मॅच रद्द करण्यात आली.
फ्रान्समधील फुटबॉल लीग 1 मधील मॅचच्या (French Ligue 1 game) दरम्यान हा प्रकार घडला. नाइस विरुद्ध मार्सिले (Nice vs Marseille) या सामन्यात चांगला खेळ होईल अशी आशा फुटबॉल फॅन्सना होती. पण मैदानात घडलेल्या राड्यामुळे त्यांना निराश व्हावं लागलं.
काय घडला प्रकार?
या मॅचमधील 75 व्या मिनिटाला हा प्रकार सुरू झाला. यजमान मार्सिलेचा स्टार फुटबॉलपटू दिमित्री पेयेट (Dimitri Payet) याला प्रेक्षकांनी बॉटल फेकून मारली. तो कॉर्नरसाठी तयार होत असताना ही बॉटल त्याच्या पाठीला लागली, असं या प्रकरणात व्हायरल झालेल्या व्हिडीओमधून स्पष्ट होत आहे.
⚽️ | This is Payet being hit with the bottle first which kicked everything off. pic.twitter.com/2kMNhidPOz
— Football For All (@FootballlForAll) August 22, 2021
या हल्ल्यानंतर संतापलेल्या पेयटनं ती बॉटल पुन्हा प्रेक्षकात फेकून मारली. त्यानंतर मैदानात दंगल सुरु झाली. पेयटला मारण्यासाठी नाइस टीमच्या फॅन्सनी मैदानात धाव घेतली. या फॅन्सपासून वाचण्यासाठी पेयट मैदानात आडवा झाला. मार्सिले टीमचे दोन खेळाडू त्याला वाचवण्यासाठी फॅन्सशी भिडले. तर मार्सिलेचा कॅप्टन संतप्त फॅन्सना शांत करण्याचा प्रयत्न करत होता. सुरक्षा रक्षकांनी मैदानात धाव घेईपर्यंत खेळाडू आणि फॅन्समध्ये दंगल सुरु झाली होती. दोन्ही टीमचे खेळाडू आणि अधिकारी यामध्ये सहभागी झाले होते.
Pitch invasion by fans during Nice-Marseille pic.twitter.com/s0drLdN97b
— 。 (@gexmsvivi) August 22, 2021
⚽️ | NEW: A member of the Marseille staff sparking a Nice fan pic.twitter.com/3lSYBvr5rd
— Football For All (@FootballlForAll) August 22, 2021
Dimitri Payet was hit by a bottle thrown by Nice fans. He threw it straight back into the crowd
The supporters STORMED the pitch and it turned into a massive brawl The Marseille managers assistant ran onto the pitch and punched one of the fanshttps://t.co/cOOBzwlGnd — SPORTbible (@sportbible) August 22, 2021
टीम इंडियाच्या 3 दिग्गजांवर एकटा जो रूट भारी, पाहा 2021 ची आकडेवारी
ही दंगल थांबल्यानंतर ही मॅच सुरु करण्याचा प्रयत्न फॅन्सनी केला. पण मर्सिलेच्या खेळाडूंनी मैदानात उतरण्यास नकार दिला. हा प्रकार घडला तेव्हा नाइसची टीम 1-0 नं आघाडीवर होती. मर्सिलेच्या खेळाडूंनी पुढील मॅच खेळण्यास नकार दिल्यानं फ्रेंच फुटबॉल लीगच्या नियमानुसार नाइसला 3-0 नं विजयी घोषित करण्यात आले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Football, Live video viral