ज्या खेळाडूमुळे झाला रक्तबंबाळ त्याला पाहताच लहानगा विसरला वेदना!

ज्या खेळाडूमुळे झाला रक्तबंबाळ त्याला पाहताच लहानगा विसरला वेदना!

दिग्गज खेळाडूमुळे लहान मुलगा जखमी झाला. ही गोष्ट समजताच त्यानं मुलासोबत फोटो काढले.

  • Share this:

लंडन, 12 ऑगस्ट : लिव्हरपूलचा स्टार फुटबॉलपटू मोहम्मद सलाहची ऑटोग्राफ घेण्याच्या नादात चिमुकला चाहता रक्तबंबाळ झाला. मोहम्मद सलाहच्या कारमागे धावताना पडल्यानं एक 11 वर्षीय चिमुकला जखमी झाला. जेव्हा मोहम्मद सलाहला ही गोष्ट समजली तेव्हा कार थांबवून त्या मुलाजवळ आला आणि त्यांच्यासोबत फोटो काढताच जखमी झालेल्या मुलाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं.

सलाह कारमधून जात असताना 11 वर्षीय लुईस आणि त्याचा भाऊ इसाक त्याला पाहण्यासाठी कारसोबत धावत होते. त्यावेळी लुइस एका खांबाला धडकला आणि खाली पडला. तेव्हा त्याच्या नाकातून रक्त वाहू लागलं.

लुईस जखमी झाल्याचं दिसताच सलाह पुन्हा मागे आला. त्यानं लहानग्या चाहत्यांसोबत फोटोही काढले. ही घटना लिव्हरपूलचा स्टार फुटबॉलपटू जेव्हा क्लब ट्रेनिंगसाठी बाहेर पडत होता त्यावेळी घडली. दोघेही सलाहची ऑटोग्राफ घेण्यासाठी धावत होते.

आपल्या आवडत्या खेळाडूची सही घेण्याच्या नादात मुलं जखमी झाल्यानंतर त्यांच्या वडिलांनी ट्वीट केलं आहे. त्यांनी सांगितलं की, सलाहनं याबद्दल माफी मागितली आहे. तो खूपच चांगला आहे. सलाहनं माझ्या मुलांकडे परत येऊन पाहिलं त्याबद्दल आभार!

मोहम्मद सलाह सध्या इंग्लिश प्रीमियर लीगमध्ये व्यस्त आहे. लीव्हरपूलनं विजय मिळवून स्पर्धेची सुरूवात केली आहे. गेल्या हंगामात त्यांना उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं होतं.

केक कापावा इतक्या सहज पाडली इमारत, पाहा घटनास्थळावरचा LIVE VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: football
First Published: Aug 13, 2019 06:53 AM IST

ताज्या बातम्या