FIFA WC 2018 : उपान्य फेरीत फ्रान्सचा दिमाखदार प्रवेश

FIFA WC 2018 : उपान्य फेरीत फ्रान्सचा दिमाखदार प्रवेश

रफाएल व्हॅरने आणि अँटोनी ग्रीझमन यांच्या गोलच्या जोरावर फ्रान्सने फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय.

  • Share this:

रशिया, 07 जुलै : रफाएल व्हॅरने आणि अँटोनी ग्रीझमन यांच्या गोलच्या जोरावर फ्रान्सने फुटबॉल विश्वचषकाच्या उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. दोन्ही सत्रात प्रत्येकी एक गोल लगावत फ्रान्सनं उरुग्वेवर 2-0 असा सहज विजय मिळवला.व्हॅरने केलेल्या गोलच्या जोरावर फ्रान्सने उरुग्वेविरुद्धच्या उपांत्यपूर्व सामन्याच्या पहिल्या सत्रात 1-0 अशी आघाडी घेतली होती. सामन्याच्या 40व्या मिनिटाला मिळालेल्या फ्री-किकचा पुरेपूर फायदा घेत व्हॅरनेने संघाला आघाडी मिळवून देण्यात मोलाची जबाबदारी निभावली.

फ्रान्सने सुरुवातीपासूनच आक्रमण करण्यास सुरुवात केली. सामन्याच्या ३९व्या मिनिटाला फ्रान्सला पेनल्टी कॉर्नर मिळाला. त्याचा फायदा घेत फ्रान्सच्या बचाव फळीतील वरानने ४०व्या मिनिटाला पहिला गोल केला. त्यामुळे पूर्वार्धात फ्रान्सचा संघ १-०ने आघाडीवर राहिला. त्यानंतर उत्तरार्धात ग्रीझमनने ६१व्या मिनिटाला गोल करून ही आघाडी वाढवली. सामना संपेपर्यंत ही आघाडी कायम राखण्यात फ्रान्सला यश आले.

हेही वाचा

दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 5 गडी राखून पराभव

डासांना पळवायचंय? हे उपाय करून पहा

VIDEO : अंगाचा थरकाप उडवणारा अपघात सीसीटीव्हीत कैद

First published: July 7, 2018, 9:35 AM IST

ताज्या बातम्या