फ्रान्सनं अर्जेंटिनाला केलं 'आऊट', मेस्सीचं स्वप्न भंगलं

फ्रान्सनं अर्जेंटिनाला केलं 'आऊट', मेस्सीचं स्वप्न भंगलं

मबापेचे दोन गोल, बेंजामिन पवार्डचा एक आणि ग्रीझमनने पेनल्टीवर केलेला गोल अशा ४ गोलच्या जोरावर फ्रान्सने अर्जेंटिनाचा पराभव केला.

  • Share this:

ब्राझिल, 30 जून : फीफा विश्वचषक स्पर्धेतील बाद फेरीच्या पहिल्या सामन्यात फ्रान्सनं अर्जेंटिनावर ४-३नं विजय मिळवला. १९ वर्षीय मबापे हा फ्रान्सच्या विजयाचा शिल्पकार ठरला.

मबापेचे दोन गोल, बेंजामिन पवार्डचा एक आणि ग्रीझमनने पेनल्टीवर केलेला गोल अशा ४ गोलच्या जोरावर फ्रान्सने अर्जेंटिनाचा पराभव केला.

अर्जेंटिनाने शेवटची काही मिनिटं असताना गोलसाठी मोठा संघर्ष केला. बरोबरी साधण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, अर्जेंटिनाला पराभव काही टाळता आला नाही. गेल्यावेळचा उपविजेता अर्जेंटिना संघही बाद फेरीतील पहिल्याच सामन्यात 'आऊट' झालाय. या पराभवामुळे मेस्सीचे वर्ल्डकप जिंकण्याचे स्वप्न भंगलं.

First published: June 30, 2018, 10:25 PM IST

ताज्या बातम्या