क्रीडाविश्वात खळबळ, मॅच फिक्सिंगप्रकरणी चार खेळाडूंवर आजीवन बंदी

क्रीडाविश्वात खळबळ, मॅच फिक्सिंगप्रकरणी चार खेळाडूंवर आजीवन बंदी

आशियाई फूटबॉल कपमध्ये 2017 आणि 2018 च्या स्पर्धेत मॅच फिक्सिंग झाल्याचं समोर आलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 02 ऑगस्ट : आशियाई फूटबॉल कपमध्ये 2017 आणि 2018 च्या स्पर्धेत मॅच फिक्सिंग झाल्याचं समोर आलं आहे. आशियाई फूटबॉलच्या प्रशासकीय समितीने या प्रकऱणी दोषी आढळलेल्या चार फूटबॉलपटूंवर आजीवन बंदीची कारवाई करण्यात आली आहे. याबाबत एशियन फूटबॉल कन्फेडरेशननं शुक्रवारी माहिती दिली. यामध्ये किर्गिस्तानच्या तीन आणि ताजिकिस्तानच्या एका खेळाडूवर कारवाई केली.

किर्गिस्तानचा फूटबॉलपटू कुर्सानबेक शेरातोव्हनं 2017 च्या एका स्पर्धेत मॅच फिक्सिग केलं होतं. त्याशिवाय इलियाज एलिमोव्ह आणि अब्दुआजीज माहकामोव हे दोन खेळाडू मॅच फिक्सिंगमध्ये अडकले होते. त्यांच्यावर 2017 आणि 2018 च्या हंगामात मॅच फिक्सिंग केल्याचा आरोप होता.

किर्गिस्तानच्या क्लब एलेकडून खेळणारा ताजिकिस्तानच्या एका खेळाडूवर आरोप होता. यामध्ये तो खेळाडू दोषी आढळला असून त्याच्यावरसुद्धा आजीवन बंदीची कारवाई करण्यात आली आहे.

आशियाई फूटबॉल कप स्पर्धा ही प्रीमियर एशियन चॅम्पियन्स लीगनंतर आशियातील दुसरी मोठी स्पर्धा आहे. आशियाई फूटबॉलवर सातत्यानं भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. 2018 मध्ये झालेल्या एका सामन्यात भ्रष्टाचार प्रकरणी एका माजी रेफरींसह इंडोनेशिया राष्ट्रीय फूटबॉल संघाशी संबंधित पाच जणांना तुरुंगवासही झाला होता.

प्रेक्षकांनी रडवलं पण त्यानं जिंकलं मैदान, सचिन-विराटलाही टाकलं मागे

Ashes : कसोटीच्या पहिल्याच दिवशी पंचांचे 7 निर्णय चुकले!

'SUPER 30'चा पार्ट 2: 75 दुणे...अचूक पाढे म्हणाऱ्या'सुपर आजी',एकदा VIDEO पाहाच

First Published: Aug 2, 2019 03:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading