LIVE सामन्यात चाहत्यानं मारली तिसऱ्या मजल्यावरून उडी, पाहा थरारक व्हिडिओ

LIVE सामन्यात चाहत्यानं मारली तिसऱ्या मजल्यावरून उडी, पाहा थरारक व्हिडिओ

राझीलच्या मोरांबी स्टेडियमवर चाहत्यांकडून असा एक प्रकार घडला, जो पाहून तुमच्याही अंगावर शहारे उभे राहतील.

  • Share this:

साऊ पाऊलो, 04 सप्टेंबर : फुटबॉलच्या मैदानावर अनेक शानदार सामने पाहायला मिळताता. फुटबॉलचा चाहता वर्गही सामने पाहण्यासाठी मैदानावर हजर असतो. मात्र ब्राझीलमध्ये अशाच एका अटीतटीच्या सामन्यादरम्यान एक भयंकर प्रकार घडला. ब्राझीलच्या मोरांबी स्टेडियमवर चाहत्यांकडून असा एक प्रकार घडला, जो पाहून तुमच्याही अंगावर शहारे उभे राहतील. मोरंबो मैदानावर साऊ पाऊलो आणि ग्रेमियो यांच्यात झालेल्या सामन्यात एका चाहत्यानं तब्बल 40 फुटांवरून खाली उडी मारली.

साऊ पाऊलो हा ब्राझीलमधील सर्वात मोठा फुटबॉल संघ आहे. हा संघ आपल्या घरच्या मैदानावर ग्रेमिया नावाच्या एक दुसऱ्या ब्राझीलमधील संघासोबत सामना खेळथ होते. याच दरम्यान एका चाहत्यानं मैदानावरील रॅलिंगवर चढण्याचा प्रयत्न केला आणि त्यानं तिथून खाली उडी मारली.

तब्बल 40 फूट ऊंचीवरून उडी मारणाऱ्या 23 वर्षीय चाहत्याचे नाव आहे रियोस डे मिलो. रियोस 40 फूटांवरून उडी मारल्यानंतर मैदानातील दोन जणांवर पडला. यात एका 13 वर्षीय मुलीचाही समावेश आहे. सुदैवानं रियोसह 13 वर्षीय मुलगी केवळ जखमी झाली. रियोसच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून, त्याला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा-Live-मुंबईकरांचे हाल,कोकण रेल्वे मार्गावर कोसळली दरड; महालक्ष्मी एक्स्प्रेस रद्द

वाचा-घाटकोपर स्थानकात चेंगराचेंगरी, मुंबईकरांनो असं धाडस करू नका!

ही सगळा घटना रियासच्या गर्लफ्रेण्डनं इंटरनेटवर पाहिल्यानंतर त्याच्या घरच्यांना याबाबत माहिती दिली. रियासची आई लिलियननं एका लोकल मीडियाला दिलेल्या माहितीत, “रियासच्या मैत्रिणीनं ही घटना इंटरनेटवर पाहिली त्यानंतर आम्हाला कळवले. आम्हाला खुप भिती वाटली होती, मात्र तो जिवंत असल्याचे कळल्यानंतर आमच्या जीवात जीव आला. एवढ्या ऊंचीवरून पडल्यानंतर आम्हाला अपेक्षा नव्हती की तो जिवंत असेल, पण त्यानं मृत्यूवर मात केला याचा आम्हाला आनंद आहे”, असे सांगितले. दरम्यान रियासनं आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला किंवा त्याला ढकलण्यात आले याबाबत पोलिस चौकशी करत आहेत.

वाचा-भारताला वर्ल्ड कप जिंकून देणाऱ्या कर्णधारानं सोडला संघ, निर्णयावेळी झाला भावुक

VIDEO: मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, किंग्ज सर्कलमध्ये अर्ध्या गाड्या पाण्याखाली!

Published by: Akshay Shitole
First published: September 4, 2019, 7:50 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading