फुटबॉल मैदानावरचं अनोखं प्रपोजल, VIDEO VIRAL

फुटबॉल मैदानावरचं अनोखं प्रपोजल, VIDEO VIRAL

10 वर्षांपासून रेफ्री डिलन टीने आपली सहकारी एलेनी ग्लॉफ्टिस एकत्र होते.

  • Share this:

एडिलेड, 28 जुलै : खेळाच्या मैदानावर खेळाडूंनी आपल्या प्रेयसींना प्रपोज केल्याचे किस्से आपल्याला माहित आहेत. मात्र पहिल्यांदाच दोन पंचांनी एकमेकांना भर मैदानाच प्रपोज केले. ज्या मैदानावर दोघांनी रेफ्री होण्याची स्वप्न पाहिली, त्याच मैदानावर त्यांनी एकमेकांना साथीदार म्हणून निवडले. या दोघांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

ऑस्ट्रेलिया फुटबॉल लीगमध्ये एडिलेड आणि कार्लटॉन यांच्यात झालेल्या सामन्यात 30 वर्षीय रेफ्री डिलन टीने आपली सहकारी एलेनी ग्लॉफ्टिस हिला प्रपोज केले. 10 वर्षांपासून हे दोघे एकमेकांमोबत राहत आहेत. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, खेळाडूंसह सामना पाहायला आलेल्या प्रेक्षकांनीही त्यांना शुभेच्छा दिल्या. एडिलेडमध्ये राहणाऱ्या डिलन आणि एलेनी यांची भेट SANFLमध्ये झाली. येथेच दोघांनी एकत्र काम करण्यास सुरुवात केली. दोघांनी पंच म्हणून काम केले असले तरी, शनिवारी झालेल्या सामन्यात पहिल्यांदाच हे दोघं एकत्र मैदानावर उतरले होते.

पहिल्यांदा दोघांनी एकत्र केलं काम

एलेनी गेली 3 वर्ष फुटबॉल सामन्यात रेफ्री म्हणून करत आहे तर, डिलन गेली 8 वर्ष या क्षेत्रात आहे. मात्र शनिवारी पहिल्यांदा त्यांनी एकत्र काम केले. याचाच संधीचे डिलनं सोनं केले, आणि एलेनीला सामना सुरु होण्याआधी प्रपोज केले. लवकरच हे दोघं लग्नबंधनात अडकणार आहेत.

वाचा-टेस्ट वर्ल्ड कपच्या रणसंग्रामाला 1 ऑगस्टपासून सुरुवात, असे आहेत नियम

VIDEO: भावुक क्षण! ऑपरेश 'महालक्ष्मी'मध्ये माकडाचीही सुटका, NDRF जवानाला अश्रू अनावर

Published by: Akshay Shitole
First published: July 28, 2019, 3:48 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading