IPL 2019 : 12व्या हंगामाच्या या खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

IPL 2019 : 12व्या हंगामाच्या या खास गोष्टी तुम्हाला माहिती आहेत का?

पहिला सामना विराट कोहली विरुध्द महेंद्रसिंग धोनी यांच्यात होणार असून कोहलीला पहिल्या आयपीएलच्या विजयाची आस असणार आहे.

  • Share this:

आयपीएलच्या 12व्या हंगामाला आजपासून सुरूवात होत आहे. या हंगामाची पहिलीच लढत चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या विरोधात होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या कोहलीच्या संघाला आपल्या विजयाची आस असणार आहे तर गतविजेता चेन्नई संघ यावर्षीही आयपीएल जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.

आयपीएलच्या 12व्या हंगामाला आजपासून सुरूवात होत आहे. या हंगामाची पहिलीच लढत चेन्नई सुपरकिंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्या विरोधात होणार आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या बंगळुरू  संघाला आपल्या विजयाची आस असणार आहे. तर गतविजेता चेन्नई संघ यावर्षीही आयपीएल जिंकण्याच्या इराद्याने मैदानात उतरेल.


या हंगमाची सुरुवात चेन्नई आणि बंगळुरू यांच्यापासून होणार आहे. त्यामुळे पहिलाच सामना धोनी विरुध्द कोहली असा रंगणार आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदाज चेन्नई आणि बंगळुरू एकमेकांविरोधात लढणार आहेत. चेन्नईच्या संघाने याआधी तीन वेळा आयपीएलचे चषक जिंकले आहे. तर, बंगळुरूचा संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात असतील

या हंगमाची सुरुवात चेन्नई आणि बंगळुरू यांच्यापासून होणार आहे. त्यामुळे पहिलाच सामना धोनी विरुध्द कोहली असा रंगणार आहे. आयपीएलमध्ये पहिल्यांदाज पहिला सामना हा चेन्नई आणि बंगळुरू एकमेकांविरोधात लढणार आहेत. चेन्नईच्या संघाने याआधी तीन वेळा आयपीएलचे चषक जिंकले आहे. तर, बंगळुरूचा संघ आपल्या पहिल्या विजयाच्या शोधात असेल.


गेल्या 11 हंगामात आयपीएलचे उद्धाटन सोहळे चांगलेच गाजले होते. अनेक बॉलीवूड तारकांनी हा सोहळा गाजवला असताना 12व्या हंगामाचा उद्धाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. 14 फेब्रारी रोजी झालेल्या पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या सोहळ्यासाठी ठरवण्यात आलेली 20 कोटींची रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहे.

गेल्या 11 हंगामात आयपीएलचे उद्धाटन सोहळे चांगलेच गाजले होते. अनेक बॉलीवुड तारकांनी हा सोहळा गाजवला असताना 12व्या हंगामाचा उद्धाटन सोहळा रद्द करण्यात आला आहे. 14 फेब्रुवारी रोजी  पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, या सोहळ्यासाठी ठरवण्यात आलेली 20 कोटींची रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहे.


आयपीएलच्या इतिहासात असे पहिल्यांदा झाले आहे की, IPL आणि लोकसभा निवडणुका एकाचवेळी होत आहे. 2009 साली लोकसभा निवडणुकांदरम्यान IPLचे सामने साऊथ आफ्रिकेला झाले होते. तर, 2014 साली IPLचे अर्धे सामने परदेशात झाले होते.

आयपीएलच्या इतिहासात असे पहिल्यांदा झाले आहे की, IPL आणि लोकसभा निवडणुका एकाचवेळी होत आहे. 2009 साली लोकसभा निवडणुकांदरम्यान IPLचे सामने साऊथ आफ्रिकेला झाले होते. तर, 2014 साली IPLचे अर्धे सामने परदेशात झाले होते.


 यंदाच्या IPLमध्ये सर्वच संघांनी सामाजिक बांधिलकी बाळगत, सामन्यांच्या तिकीट विक्रीतून मिळणारी रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहे. चेन्नई आणि पंजाबच्या संघाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.


यंदाच्या IPLमध्ये सर्वच संघांनी सामाजिक बांधिलकी बाळगत, सामन्यांच्या तिकीट विक्रीतून मिळणारी रक्कम शहीद जवानांच्या कुटुंबीयांना देण्यात येणार आहे. चेन्नई आणि पंजाबच्या संघाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 23, 2019 05:12 PM IST

ताज्या बातम्या