मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /यश पचवता आलं नाही; सुशीलसारखेच हे 5 खेळाडूही शिखरावर पोहोचल्यावर झाले व्हिलन

यश पचवता आलं नाही; सुशीलसारखेच हे 5 खेळाडूही शिखरावर पोहोचल्यावर झाले व्हिलन

2008 ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकवत सुशील कुमारने (Sushil Kumar) देशात कुस्तीला नवी ओळख मिळवून दिली. यानंतर 2012 ऑलिम्पिकमध्ये त्याने पुन्हा एकदा सिल्व्हर मेडल पटकावलं

2008 ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकवत सुशील कुमारने (Sushil Kumar) देशात कुस्तीला नवी ओळख मिळवून दिली. यानंतर 2012 ऑलिम्पिकमध्ये त्याने पुन्हा एकदा सिल्व्हर मेडल पटकावलं

2008 ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकवत सुशील कुमारने (Sushil Kumar) देशात कुस्तीला नवी ओळख मिळवून दिली. यानंतर 2012 ऑलिम्पिकमध्ये त्याने पुन्हा एकदा सिल्व्हर मेडल पटकावलं

मुंबई, 23 मे : 2008 ऑलिम्पिकमध्ये ब्रॉन्झ मेडल पटकवत सुशील कुमारने (Sushil Kumar) देशात कुस्तीला नवी ओळख मिळवून दिली. यानंतर 2012 ऑलिम्पिकमध्ये त्याने पुन्हा एकदा सिल्व्हर मेडल पटकावलं, यानंतर देशाच्या छोट्या कोपऱ्यातही कुस्तीला पुन्हा एकदा सुगीचे दिवस यायला सुरुवात झाली. अनेक तरुणांनी पुन्हा एकदा कुस्तीकडे आपला मोर्चा वळवला, पण आज हाच सुशील कुमार वादात सापडला आहे. सुशील कुमारवर ज्युनियर पैलवान सागर धनखड याच्या हत्येचा आरोप आहे. यशाच्या शिखरावर पोहोचल्यानंतर वादात सापडलेला आणि व्हिलन बनलेला सुशील काही पहिलाच खेळाडू नाही.

माईक टायसन : अमेरिकेचा सगळ्यात मोठा बॉक्सिंग खेळाडू अशी ओळख असलेला माईक टायसन (Mike Tyson). हेवी वेट कॅटेगरीमधला आतापर्यंतचा सगळ्यात महान खेळाडू म्हणून त्याला ओळखलं जातं, पण त्यालादेखील हे यश पचवता आलं नाही. 1992 साली माईक टायसन याच्यावर बलात्काराचा गुन्हा सिद्ध झाला होता, ज्यानंतर त्याला 6 वर्षांची शिक्षाही झाली होती. 58 प्रोफेशनल फाईटपैकी त्याने 50 विजय मिळवले होते, यातले 44 तर त्याने नॉकआऊटने जिंकले.

डिएगो मॅराडोना : अर्जेंटिनाच्या फूटबॉल टीमचा कर्णधार असलेल्या मॅरेडोनाने (Diego Maradona) टीमला 1986 साली वर्ल्ड कप जिंकवून दिला. मॅरेडोनाने 4 वर्ल्ड कप खेळले, पण ड्रग्सच्या कारणांमुळे मॅरेडोना वादात राहिले. 1994 साली वर्ल्ड कप दरम्यानच त्यांना मायदेशात परत पाठवण्यात आलं होतं. अमेरिकेत झालेल्या या स्पर्धेत मॅरेडोना ड्रग्स टेस्टमध्ये अपयशी ठरले होते. मॅराडोना अर्जेंटिना टीमचे प्रशिक्षकही बनले होते.

हॅन्सी क्रोनिए : दक्षिण आफ्रिकेचा सगळ्यात यशस्वी कर्णधार असलेला हॅन्सी क्रोनिए (Hansie Cronje) 2000 साली मॅच फिक्सिंगमध्ये अडकला. हॅन्सी क्रोनिएच्या मॅच फिक्सिंग प्रकरणामुळे क्रिकेट विश्वात खळबळ माजली, यानंतर त्याच्यावर आयुष्यभरासाठी बंदी घालण्यात आली. 2002 साली एका विमान अपघातात हॅन्सी क्रोनिएचा मृत्यू झाला. हॅन्सी क्रोनिएने दक्षिण आफ्रिकेसाठी 68 टेस्ट आणि 188 वनडे खेळल्या.

लान्स आर्मस्ट्रॉन्ग : अमेरिकेचा सगळ्यात मोठा सायकलपटू असलेला लान्स आर्मस्ट्रॉन्ग (Lance Armstrong) याने 7 वेळा टूर डी फ्रान्स किताब जिंकला, पण यानंतर तो डोपिंगमध्ये अडकला. याचकारणामुळे आर्मस्ट्रॉन्गचे किताबही काढून घेण्यात आले, यानंतर त्याच्यावर 2012 साली आयुष्यभरासाठी बंदी घालण्यात आली. 1999 ते 2005 या कालावधीमध्ये आर्मस्ट्रॉन्गने लागोपाठ 7 वेळा टूर डी फ्रान्स जिंकली होती.

सुशील कुमार : सुशील कुमार भारतीय कुस्तीच्या इतिहासातल्या दिग्गज कुस्तीपटूपैकी एक. स्वातंत्र्यानंतर कुस्तीमध्ये दोन ऑलिम्पिक मेडल जिंकणारा सुशील कुमार एकमेव भारतीय आहे. वर्ल्ड चॅम्पियनशीप आणि कॉमनवेल्थ गेम्समध्येही त्याने गोल्ड मेडल जिंकलं, पण आज त्याच्यावर हत्येचा आरोप झाला आहे.

First published: