PHOTO : भारताचे 'हे' चार युवा शिलेदार असतील पुढच्या वर्ल्डकपसाठी पात्र

आयपीएलचे पडगम वाजायला सुरूवात झाले असताना, आता खेळाडूंची नजर आहे ती, इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपकडे. यंदाच्या आयपीएलमध्ये बरेच नवखे खेळाडू पर्दापण करतील, पण यातले हे पाच खेळाडू वर्ल्डकपच्या निवड समितीचे लक्ष वेधू शकतात.

  • Share this:

भारताचा कसोटी फलंदाज पृथ्वी शॉनं वयाच्या 18व्या वर्षीच आपल्या फलंदाजीच्या जोरावर सर्वांचे लक्ष वेधले. पृथ्वी शॉला छोटा सचिन म्हणूनही ओळखली जातो. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पहिल्याच कसोटीत दुखापतग्रस्त झाल्यानंतर पृथ्वी रविवारी (24 मार्च) मुंबई इंडियन्स विरोधात आपला पहिला सामना खेळला होता. कसोटी क्रिकेटमध्ये पृथ्वीनं आपली टॅलेंट दाखवले असले तरी, एकदिवसीय क्रिकेटमध्ये त्यांने भारतासाठी एकही सामना खेळलेला नाही. त्यामुळे पृथ्वी शॉकरिता वर्ल्डकपचे तिकीट मिळवण्याचा एकच पर्याय आहे, तो म्हणजे आयपीएलमध्ये चांगली फलंदाजी करणं. नाहीतर 2023च्या विश्वचषकात पृथ्वीची वर्णी लागेलच.

प्रथम श्रेणीतील दिल्ली संघाचा आणि आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स या संघाचा कर्णधार मुंबईकर श्रेयस अय्यर यांने गेल्या काही वर्षात आयपीएलसह रणजीही गाजवलं. 24 वर्षांच्या श्रेयसनं भारत अ संघासाठीही चांगली फलंदाजी केली आहे. 2017 साली श्रेयसनं टी-20 आणि एकदिवसीय क्रिकेटमध्ये पर्दापण केलं. पण त्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपली जागा श्रेयसला बनवता आली नाही.

पृथ्वी शॉनंतर सर्वात जास्त चर्चीला जाणारा कोणता युवा खेळाडू असेल तर तो आहे, शुभमन गिल. पंजाबकडून प्रथम श्रेणीत खेळणारा हा खेळाडू आयपीएलमध्ये कोलकता नाइट रायडर्स संघाकडून खेळतो. आयसीसी अंडर 19 वर्ल्डकपमध्ये शुभमनच्या खेळामुळे तो मालकावीर झाला होता. त्यामुळे या उभरत्या सिताऱ्यानं लगचेच भारतीय संघात एन्ट्री केली. 2019च्या नाही तर 2023च्या वर्ल्डकपसाठी भुभमन गिलला नक्कीत तिकीट मिळू शकते.

Loading...

कर्नाटककडून प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळणारा मयंक अग्रवाल हा युवा फलंदाज आपल्या आक्रमक फलंदाजीमुळं ओळखला जातो. मयंकनं प्रथम श्रेणीत कर्नाटककडून 2141 धावा केल्या आहेत. यंदाच्या आयपीएलमध्ये मयंक पंजाब संघाकडून खेळत आहे. याआधी मयंक 2011-2013पर्यंत बंगळुरू संघात होता तर, 2014-2016मध्ये दिल्ली संघात, 2017मध्ये पुणे संघात होता. 2018मध्ये सप्टेंबर मध्ये वेस्ट इंडिज विरोधातच्या कसोटी मालिकेत मयंकचा समावेश होता, पण तो एकही सामना खेळला नाही. नुकत्याच झालेल्या ऑस्टेलिया दोऱ्यात मयंकने कसोटीत पर्दापण केले. आपल्या पर्दापणाच्या सामन्यातच त्यानं 76 धावा केल्या होत्या. त्यामुळे येत्या वर्ल्डकपमध्ये मयंकची वर्णी लागू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 27, 2019 02:09 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...