IPL 2019 : ‘या’ पाच खेळाडूंना मिळू शकते वर्ल्डकपचे तिकीट

IPL 2019 : ‘या’ पाच खेळाडूंना मिळू शकते वर्ल्डकपचे तिकीट

भारतीय संघाचे काही खेळाडू इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपकरिता आपले तिकीट पक्के करण्याच्या प्रयत्नांत आहेत.

  • Share this:

मुंबई, १७ मार्च-  मार्च महिन्याच्या 23  तारखेपासून सुरू होत असलेल्या आयपीएलकरिता सर्व खेळाडू सज्ज आहेत. मात्र भारतीय संघाचे काही खेळाडू इंग्लंडमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपकरिता आपले तिकीट पक्के करण्याच्या प्रयत्नांत आहेत. सध्या आयपीएलच्या केवळ 17 सामन्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. असे असले तरी, हे पाच दमदार खेळाडू आपल्या पहिल्या सामन्यांपासूनच चांगली खेळी करण्याच्या तयारीत असतील.

दिनेश कार्तिक:

अनुभवी विकेटकीपर असलेल्या दिनेश कार्तिकला नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत खेळण्याची संधी देण्यात आलेली नव्हती. कार्तिकच्या जागी ऋषभ पंत याला संधी देण्यात आली होती. मात्र, रिषभची या मालिकेतील निराशाजनक कामगिरी पाहता, वर्ल्डकपचे दरवाजे पुन्हा एकदा दिशेन कार्तिकसाठी उघडले आहेत. त्यातच इंग्लंडमध्ये उसळी गोलंदाजी विरोधात किपींग करणे, पंतसाठी सोपे जाणार नाही, त्यामुळे कार्तिकचा विचार नक्कीच होऊ शकतो. दरम्यान, कोलकत्ता संघाचा कर्णधार असलेल्या दिनेश कार्तिकला आयपीएलच्या या हंगामात चांगली कामगिरी करुन थेट वर्ल्डकपसाठी आपली जागा नक्की करता येणार आहे. त्यामुळे कार्तिकला आपल्या बॅंटिंग बरोबरच आपल्या किपिंगकडेही लक्ष द्यावे लागणार आहे.

कृणाल पांड्या:

पांड्या बंधुंनी सध्या टी-20 जगात आपल्या नावाचा दबदबा तयार केला असला तरी, एकदिवसीय संघात केवळ हाद्रिक पांड्या आपली जागा निश्चित करु शकला आहे. त्यामुळे भारताच्या टी 20 संघाचा हिस्सा झालेल्या कृणाल पांड्याला वर्ल्ड कपसाठी संघात सहभागी होण्याची संधी आहे. सध्या रविंद्र जडेजाचा ढासळत चाललेला फॉर्म पाहता, कृणाल पांड्याला जडेजाच्या या वाईट कामगिरीचा फायदा होऊ शकतो. जडेजाच्या तुलनेत कृणाल गोलंदाजीतही उत्तम आहे. त्यामुळे सध्या मुंबई इंडियन्सच्या संघात असलेल्या पांड्याच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष आहे.

अजिंक्य रहाणे:

ऑस्ट्रेलियाविरोधात मानहानी पराभव स्वीकारल्यानंतर, भारताच्या मधल्या फळीची चिंता जास्त वाढली आहे. त्यामुळे सध्या चौथ्या क्रमांकावर असलेल्या अंबाती रायडूच्या फ्लॉप शोनंतर कसोटी संघाचा माजी कर्णधार अजिंक्य रहाणेला वर्ल्डकपमध्ये तिकीट मिळण्याची शक्यता आहे. मात्र, रहाणेने 2018 मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. त्यामुळे आयपीएलमध्ये रहाणे कसा खेळतो हे पाहणे महत्वाचे असणार आहे. सध्या राजस्थान संघाचा कर्णधार असलेल्या रहाणेला कर्णधारपदाबरोबरच आपला फॉर्मही टिकवून ठेवावा लागेल.

पृथ्वी शॉ:

भारताचा उभरता तारा म्हणून पृथ्वी शॉकडे पाहिले जाते. दरम्यान कसोटी सामन्यातून आपला दमदार खेळ दाखवल्यानंतर, पृथ्वी शॉ टी-20मध्ये काय करतो, याची उत्सुकता क्रिकेट प्रेमींमध्ये आहे. त्यामुळे सध्या आयपीएलमध्ये दिल्लीच्या संघाकडून खेळणाऱ्या पृथ्वीला टी-20मध्येही आपली जादू दाखवावी लागणार आहे. त्यातच वर्ल्डकपकरिता रिझर्व्ह ओपनर म्हणूनही पृथ्वीची वर्णी लागू शकते. त्यामुळे आयपीएमध्ये चांगले खेळण्याचा दबाव पृथ्वी शॉवर नक्कीच असेल.

खलील अहमद:

एकीकडे फलंदाजीमध्ये केवल एकच जागा बाकी असताना, गोलंदाजीमध्ये विराट किती गोलंदाज घेऊन उतरतो, यावर काही गोलंदाजांची वर्णी लागू शकते. सध्यातरी वर्ल्डकपसाठी जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि भुवनेश्वर कुमार यांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. त्यामुळे जर, उमेश यादव याची खेळी उत्तम राहिली नाही तर, खलील अहमद याला संधी मिळू शकते. आयपीएलमध्ये हैदराबादकडून खेळणाऱ्या खलीलच्या खेळाकडे निवड समितीचे विशेष लक्ष असणार आहे.

आयपीएलच्या 12व्या हंगामाची सुरुवात 23 मार्चला एम ए चिदंबरम स्टेडिअमवर होणार आहे. यावेळी चेन्नई आणि बंगळुरु हे दोन संघ हंगामाची दणक्यात सुरुवात करतील. सध्या केवळ पहिल्या दोन आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर झाले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 17, 2019 05:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading