'या' पाच शिलेदारांनी गाजवलं विजय हजारे करंडक! आता उघडणार टीम इंडियाचे दरवाजे

'या' पाच शिलेदारांनी गाजवलं विजय हजारे करंडक! आता उघडणार टीम इंडियाचे दरवाजे

विजय हजारे स्पर्धेने भारताला दिले पाच दमदार खेळाडू.

  • Share this:

कर्नाटक, 26 ऑक्टोबर : भारतीय संघाला युवा आणि शानदार खेळाडू मिळतात ते स्थानिक क्रिकेटमधून. अशाच काही युवा खेळाडूंनी नुकत्याच पार पडलेल्या विजय हजारे करंडक स्पर्धेत दमदार कामगिरी केली. विजय हजारे करंडक स्पर्धेत चौथ्यांदा कर्नाटक संघान बाजी मारली. तमिळनाडू संघाला पराभूत करत हे करंडक आपल्या नावावर केले. मात्र या स्पर्धेत दमदार कामगिरी केली ती या सात युवा खेळाडूंनी. टाकुया नजर या सात खेळाडूंच्या कामगिरीवर.

संजू सॅमसन

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून चार वर्ष संजूला टीम इंडियात खेळण्याची संधी मिळाली नाही. 2015मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केल्यानंतर खराब फॉर्ममुळं लगेचच संघाबाहेर गेला. मात्र विजय हजारे करंडक स्पर्धेमुळं याच संजूनं पुन्हा एकदा भारतीय संघात स्थान मिळवले आहे. या स्पर्धेतील शानदार कामगिरीमुळं त्याला बांगलादेश दौऱ्यात संधी मिळाली. संजूनं विजय हजारे स्पर्धेत 58.57च्या सरसरीनं 410 धावा केल्या. यात एका द्विशतकाचा समावेश आहे. गोवा विरोधात संजूनं 212 धावांची खेळी केली.

शिवम दुबे

संजू सॅमसनसोबत या युवा खेळाडूनं विजय हजारे स्पर्धेतील कामगिरीच्या जोरावर संघात स्थान मिळवले. 26 वर्षीय शिवमनं 48.19च्या सरासरीनं धावा केल्या. या खेळीच्या जोरावर त्याला बांगलादेश विरोधात टी-20 संघात स्थान मिळाले. विजय हजारे स्पर्धेत शिवमनं 67 चेंडूत शानदार अशा 118 धावांची खेळी केली.

केएल राहुल

खराब फॉर्ममुळं भारतीय संघाबाहेर असलेल्या केएल राहुलनं विजय हजारे स्पर्धेत दमदार कामगिरी केली. कर्नाटकला विजय हजार स्पर्धेचे विजेतेपद मिळवण्यात त्याचे मोठे योगदान होते. राहुलनं 66.44च्या सरासरीनं सलामीचा फलंदाज म्हणून चांगली कामगिरी केली. या स्पर्धेत सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत केएल राहुल तिसऱ्या स्थानावर आहे.

बाबा अपराजित

तमिळनाडूच्या अष्टपैलू खेळाडूनं या स्पर्धेत शानदार कामगिरी केली. विजय हजारे करंडकमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत बाबा अपराजित चौथ्या क्रमांकावर आहे. अपराजितनं 12 सामन्यात 66.44च्या सरासरीनं 598 धावा केल्या आहेत. त्याचबरोबर रेल्वे विरोधात झालेल्या सामन्यात त्यानं शतकी कामगिरी केली होती. तर, गोलंदाजीमध्ये 10 ओव्हरमध्ये 30 धावा देत 4 विकेट घेतल्या होत्या.

यशस्वी जयस्वाल

विजय हजारे करंडकमधून कोणत्या खेळाडूच्या नावाची विशेष चर्चा झाली असेल तर तो खेळाडू आहे मुंबईकर यशस्वी जयस्वाल. यशस्वीनं 17 वर्षात या स्पर्धेत द्विशतक करण्याची कामगिरी केली. मुंबईकर खेळाडूनं 6 सामन्यात 564 धावा केल्या. तर, सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत यशस्वी पाचव्या क्रमांकावर आहे. त्यानं गोवा संघाविरोधात 113 तर केरळ विरोधात 113 धावांची खेळी केली. याशिवाय झारखंड विरोधात दुहेरी शतक करण्याची कामगिरी केली.

त्यामुळं पुढच्या दौऱ्यांमध्ये या पाच खेळाडूंना कसोटी किंवा एकदिवसीय संघात नक्कीच संधी मिळू शकते.

First published: October 27, 2019, 7:15 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading