World Cup : 'या' खेळाडूंनी मिळवून दिला वर्ल्ड चॅम्पियनचा ताज, त्यांनाच विराटकडून डच्चू

World Cup : 'या' खेळाडूंनी मिळवून दिला वर्ल्ड चॅम्पियनचा ताज, त्यांनाच विराटकडून डच्चू

भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.

  • Share this:

मुंबई, 21 मे : विश्वचषकासाठी आता केवळ नऊ दिवसांचा कालावधी उरला असताना, सध्या सर्व संघ जय्यत तयारी करित आहे. दरम्यान भारतीय संघ आज इंग्लंडसाठी रवाना झाला. 30 मे पासून वर्ल्ड कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे, परंतु भारताचा पहिला सामना 5 जूनला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे. इंग्लंडमध्ये होणाऱ्या विश्वचषकासाठी भारतानं सोमवारी 15 खेळाडूंच्या नावाची घोषणा केली. दरम्यान यात दिनेश कार्तिक, विजय शंकर यांच्या नावानं सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला.

मात्र 2019च्या वर्ल्ड कपच्या संघात भारताला 2011 साली 28 वर्षांनी विश्वचषक जिंकवून देणाऱ्या या पाच खेळाडूंचा समावेश करण्यात आलेला नाही. 2011 साली, कर्णधार महेंद्रसिंह धोनीनं शेवटच्या चेंडूवर माही स्टाईलनं हेलिकॉप्टर शॉट मारत भारताला हा ऐतिहासिक विजय मिळवून दिला. पण या मालिकेत सर्वात जास्त धावा करत सलामीवीराचा मान मिळवला तो युवराज सिंगनं. मात्र, युवराज सिंगसह हे चार खेळाडू यानंतर कदाचित कधीच विश्वचषक खेळू शकणार नाही.

युवराज सिंग

महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतानं विश्वचषक जिंकला. पण याचा खरा हिरो ठरला तो, युवराज सिंग. 2011च्या विश्वचषका युवीचा खेळ शानदार होता. युवराजनं विश्वचषकात एकूण 9 सामन्यात 90.5च्या सरासरीनं 362 धावा केल्या. तर, किफायतशीर गोलंदाजी करत 15 विकेटही घेतल्या. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, कॅन्सर सारख्या जीवघेण्या आजाराचा त्रास होत असतानाही युवराज सर्व सामने खेळला. त्याला काही सामन्यांदरम्यान रक्ताच्या उलट्याही झाल्या होत्या. त्यानंतर कॅन्सरच्या आजारातून युवी बरा झाला. पण त्याला त्याचा फॉर्म टिकवता आला नाही. त्यामुळं कदाचित त्याची भारतीय संघात निवड झाली नसावी.

सुरेश रैना

धोनीचा डावा हात अशी ओळख असलेल्या सुरेश रैना हा आयपीएलमधला सर्वात जास्त धावा करणारा खेळाडू आहे. एवढंच नाही तर, सुरेश रैना हा टी-20 मध्ये पहिलं शतक ठोकणारा खेळाडू बनल होता. सुरेश रैना हा 2011च्या विश्वचषकाच्या संघातही होता. त्यानं उपांत्य फेरीत पाकिस्ताना विरोधात 28 चेंडूत 4 धावा केल्या होत्या. त्याच्या या यशस्वी खेळीच्या जोरावर भारतानं अंतिम सामन्यात धडक मारली होती. मात्र, 2019च्या विश्वचषकात त्याला संघात स्थान दिलं नाही.

हरभजन सिंग

भज्जी या नावानं प्रसिध्द असलेला भारताचा फिरकीपटू हरभजन सिंगनं 1998मध्ये न्युझीलंड विरोधात एकदिवसीय क्रिकेट सामन्यात पदार्पण केलं. 2003च्या विश्वचषकाच्या संघात हरभजनचा समावेश करण्यात आला होता. त्यानंतर 2011च्या विश्वचषकातही त्याला स्थान देण्यात आलं होतं. पण शेवटचा सामना हरभजन सिंग 2006 साली खेळला होता. त्यामुळं हरभजन सिंग निवृत्ती घेणार असं वाटत असताना, त्यानं निवृत्ती घेतली नाही. त्यामुळं त्याचा यंदाच्या विश्वचषकात त्याला सामिल करण्याची कोणतीच अपेक्षा नव्हती. मात्र, हरभजन सिंगचा 2011हाचा शेवटचा विश्वचषक असेल.

मुनाफ पटेल

भारताचा जलद गोलंदाज म्हणून 2006 साली पदार्पण केलेल्या मुनाफ पटेल भारताच्या चॅम्पियन संघात होता. याआधी 2007 साली विश्वचषक संघात त्याला सामिल करण्यात आले होते. मात्र त्याची गोलंदाजी विशेष काही चालली नाही. मुनाफनं शेवटचा सामना 2011 साली खेळला होता. त्यानंतर काही सामने आयपीएलमधले तो खेळला,त्यामुळं त्याची वर्णी आताच्या संघात लागणं जवळजवळ अशक्य होतं.

पियुष चावला

आयपीएलच्या बाराव्या हंगामात कोलकाताकडून खेळणारा यशस्वी फिरकी गोलंदाज पियुष चावला यानं काही काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट गाजवलं. मात्र नंतर त्याला चांगल्या संधी मिळाल्या नाहीत. 2011च्या विश्वचषकाच्या 15 खेळाडूंमध्ये पियुष चावलाचं नाव होतं. त्याचाही 2011चा विश्वचषक शेवटचा असेल. पियुष सध्या फक्त प्रथम श्रेणी क्रिकेट खेळतो.

2019 च्या वर्ल्ड कपसाठी भारतीय संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, लोकेश राहुल, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), केदार जाधव, हार्दिक पंडय़ा, विजय शंकर, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, मोहम्मद शमी, रविंद्र जडेजा, दिनेश कार्तिक.

वाचा- IPL मधील 'हा' महागडा खेळाडू ऐनवेळी इंग्लंडच्या संघात

वाचा- 106 कर्णधार तोडू शकले नाहीत 'दादा'चा विक्रम, विराटला संधी!

वाचा- सत्य कटू असतं, पाकच्या खेळाडूने केला असा निषेध

VIDEO : वर्ल्डकपसाठी काय आहे टीमचा प्लॅन? विराट कोहलीची UNCUT पत्रकार परिषद

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 21, 2019 05:38 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading