... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही

... म्हणून आजही धोनीसारखा फिनिशर टीम इंडियाकडे नाही

सामनावीरचा पुरस्कार मिळवत पुन्हा एकदा आपणच बेस्ट फिनिशर असल्याचं सिद्ध केलं. पाहूया त्याच्या पाच मॅच फिनिशर खेळी...

  • Share this:

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने पुन्हा एकदा टीकाकारांना उत्तर दिलं आहे. धोनीने सामन्याचा शेवट विजयाने करत मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवून दिला आणि पुन्हा एकदा आपणच बेस्ट फिनिशर असल्याचं सिद्ध केलं. पाहूया त्याच्या पाच मॅच फिनिशर खेळी...

आजच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धोनीने ७४ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण करत भारताला वनडे मालिकेत ऐतिहासिक विजय मिळवून दिला. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही धोनीनेच सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

आजच्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यात धोनीने ७४ चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने अर्धशतक पूर्ण करत भारताला ऐतिहासिक वनडे मालिका विजय मिळवून दिला. या मालिकेतील दुसऱ्या सामन्यातही धोनीनेच सामना जिंकून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

श्रीलंकेविरुद्ध 2013 मध्ये तिरंगी मालिकेत तंदुरूस्त नसतानाही धोनीने नाबाद 45 धावांची खेळी करत भारताला विजय मिळवून दिला होता. मालिकेच्या सुरुवातीला दुखापतग्रस्त झालेला धोनी अंतिम सामना जिंकून देण्यासाठी मैदानात उतरला होता. लंकेने दिलेल्या 202 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची अवस्था 3 बाद 139 वरून 7 बाद 152 अशी झाली होती. तेव्हा तळातील फलंदाजांच्या मदतीने त्याने भारताला 2 चेंडू राखून विजय मिळवून दिला होता.

भारत 2006 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर होता. त्यावेळी पाकिस्तानने 288 धावांचे आव्हान दिले होते. सचिन तेंडुलकर वगळता भारताचे सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले होते. सचिन 95 धावांवर बाद झाल्यानंतर संघाची मदार युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनीवर होती. या सामन्यात धोनीने 46 चेंडूत 72 धावांची झंझावाती खेळी करताना युवराजसोबत 102 धावांची शतकी भागिदारी केली होती. भारताने हा सामना 5 गडी आणि 14 चेंडू राखून जिंकला होता.

भारत 2006 मध्ये पाकिस्तान दौऱ्यावर होता. त्यावेळी पाकिस्तानने 288 धावांचे आव्हान दिले होते. सचिन तेंडुलकर वगळता भारताचे सलामीचे फलंदाज स्वस्तात बाद झाले होते. सचिन 95 धावांवर बाद झाल्यानंतर संघाची मदार युवराज सिंग आणि महेंद्रसिंग धोनीवर होती. या सामन्यात धोनीने 46 चेंडूत 72 धावांची झंझावाती खेळी करताना युवराजसोबत 102 धावांची शतकी भागीदारी केली होती. भारताने हा सामना 5 गडी आणि 14 चेंडू राखून जिंकला होता.

सलामीचे फलंदाज गारद झाल्यानंतर तळाच्या फलंदाजांना सोबत घेऊन अनेक वेळा त्याने एका बाजूने खेळत सामना जिंकून दिला. 2012 मध्ये कॉमनवेल्थ बँक सिरीजमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध त्याने 44 धावांची खेळी करून भारताला सामना जिंकून दिला होता. या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये 13 धावांची गरज होती. धोनीसोबत रवीचंद्रन अश्विन मैदानावर होता. यावेळी धोनीने 112 मीटर षटकार खेचत भारताला विजय मिळवून दिला होता.

1983 ला आयसीसी वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारत पुन्हा एकदा विश्वविजेता होण्यासाठी 2011 ला सज्ज झाला होता. तेव्हाही धोनीनेच बेस्ट फिनिशरची भूमिका बजावली होती. श्रीलंकेविरुद्ध त्याने 91 धावांची खेळी केली होती. या सामन्यातही त्य़ाने षटकार खेचत विश्वचषकावर भारताचं नाव कोरलं होतं.

1983 ला आयसासी वर्ल्डकप जिंकल्यानंतर भारत पुन्हा एकदा विश्वविजेता होण्यासाठी 2011 ला सज्ज झाला होता. तेव्हाही धोनीनेच बेस्ट फिनिशरची भूमिका बजावली होती. श्रीलंकेविरुद्ध त्याने 91 धावांची खेळी केली होती. या सामन्यातही त्य़ाने षटकार खेचत विश्वचषकावर भारताचे नाव कोरलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 18, 2019 04:43 PM IST

ताज्या बातम्या