टी-20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियात होणार ‘या’ पाच युवा खेळाडूंची एण्ट्री!

भारतीय खेळाडूंच्या सुमार फलंदाजीनंतर हे पाच युवा फलंदाज असणार निवड समितीच्या रडारवर.

  • Share this:

पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपमध्ये भारतीय संघात अजूनही मधल्या फळीत चांगले फलंदाज नाही. याचा प्रत्यय दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या अखेरच्या टी-20 सामन्यात झाला.

दक्षिण आफ्रिका विरोधात झालेल्या अखेरच्या टी-20 सामन्यात भारतानं सुमार फलंदाजी केली. सलामीच्या फलंदाजापासून ते सलामीच्या फलंदाजांना कोणालाही चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळं विराटला युवा खेळाडूंवर अवलंबून राहावे लागणार आहे.

टी-20 क्रिकेटमध्ये ऋषभ पंत चांगली कामगिरी करू न शकल्यामुळं इशान किशनला वर्ल्ड कपमध्ये संधी मिळू शकते. इशान किशनं भारतीय संघ अकडून चांगली फलंदाजी केली होती. त्याचबरोबर आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून इशानं नेहमीच चांगली फलंदाजी केली आहे.

याचबरोबर केरळचा फलंदाज संजू सॅमसन यालाही संघात स्थान मिळू शकते. याआधी निवड समितीनं ऋषभ पंतच्या जागी इशान किशन आणि संजू सॅमसन या दोन नावांची शिफारस केली होती.

केरळचा फलंदाज संजू सॅमसननं 2015मध्ये एकमात्र आंतरराष्ट्रीय टी-20 सामना खेळला. मात्र आयपीएलमध्ये राजस्थान रॉयल्सकडून खेळताना शानदार प्रदर्शन केले आहे. संजू सध्या फॉर्ममध्येही आहे. इंडिया ए आणि दक्षिण आफ्रिका ए यांच्यात झालेल्या सामन्यात संजूनं 48 चेंडूत 91 धावा केल्या. त्यामुळं त्याला संघात जागा मिळू शकते.

टी-20 संघात जागा मिळवण्यासाठी एक नाव आघाडीवर आहे ते म्हणजे शुभमन गिल. शुभमननं याआधी भारताच्या कसोटी संघात जागा मिळवली. मात्र त्यानं आयपीएलमध्ये कोलकाता संघासोबत 37 सामन्यात 132च्या स्ट्राईक रेटनं फलंदाजी केली आहे.

भारतीय संघात संधी मिळण्याच्या यादीत आणखी एक नाव आहे, कर्नाटकचा फिरकी गोलंदाज श्रेयस गोपाळ. श्रेयसनं आयपीएलमध्ये 14 सामन्यात 20 विकेट घेतल्या होत्या. त्यानंतर त्याची श्रीलंके ए विरोधात झालेल्या मालिकेत संघात जागा मिळाली होती.

दरम्यान टी-20 वर्ल्ड कपमध्ये टीम इंडियात संधी मिळावी यासाठी आणखी एक खेळाडू धडपडत आहे. या खेळाडूचे नाव आहे दिनेश कार्तिक. 35 वर्षीय कार्तिकनं मागच्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरोधात झालेल्या सामन्यात 30 आणि 22 धावा केल्या होत्या. त्यामुळं कार्तिकला आयपीएलच्या खेळीवर संघात स्थान मिळेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 25, 2019 06:58 AM IST

ताज्या बातम्या