सेहवागसह 'या' चार दिग्गजांचे नाव निवड समितीच्या प्रमुखपदासाठी आघाडीवर

टीम इंडियाचे सध्याचे प्रमुख एमएसके प्रसाद आणि गगन खोडा याचा कार्यकाळ संपला आहे.

  • Share this:

भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बीसीसीआयच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. दरम्यान याचबरोबर आता निवड समितीच्या प्रमुखपदासाठीही निवडणूक घेण्यात येणार आहे.

टीम इंडियाचे सध्याचे प्रमुख एमएसके प्रसाद आणि गगन खोडा याचा कार्यकाळ संपला आहे. त्यामुळं लवकरच नव्या समितीची स्थापना करण्यात येणार आहे. यासाठी गांगुली अर्जदारांची मुलाखत घेऊ शकतो.

भारताचा तुफानी माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग याचे नाव आघाडीवर आहे. सेहवाग टी-10 लीगमध्ये तसेच, आयपीएलमध्ये दिल्ली संघाचा मेंटोर आहे. सेहवागनं भारतासाठी कसोटीमध्ये 8586 तर, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 8273 धावा केल्या आहेत.

याशिवाय माजी फिरकीपटू लक्ष्मण शिवरामाकृष्णन यांचे नावही या यादीत आहे. लक्ष्मण यांनी भारतासाठी जास्त सामने खेळले नसले तरी, त्यांनी सलालोचक म्हणून काम केले आहे. लक्ष्मण यांनी 9 कसोटी आणि 16 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यात अनुक्रमे 25 आणि 15 विकेट घेतल्या आहेत.

भारताचा विस्फोटक फलंदाज मोहम्मद कैफचे नाव घेतले की इंग्लंडमधल्या विजयाची आठवण येते. त्यामुळं गांगुलीकडे अध्यक्षपद गेल्यानंतर त्याच्याच गटातील कैफला ही संधी मिळू शकते.

याशिवाय भारताचे माजी फलंदाजी कोच संजय बांगरही या पदासाठी आघाडीवर आहेत. बांगर यांच्यामुळं भारताला अनेक चांगले फलंदाज मिळाले आहेत. त्यामुळं निवड समितीसाठी बांगर यांचे नाव आघाडीवर आहे.

भारताचा कर्णधार विराट कोहलीला राष्ट्रीय संघात स्थान दिलेल्या दिलीप वेंगसरकर यांना पुन्हा हे पद मिळू शकते. 2006-08मध्ये दिलीप वेंगसरकर निवड समितीच्या प्रमुखपदी होते. त्यामुळं आता त्यांची निवड झाल्यास मुंबईच्या खेळाडूंना नक्कीच संधी मिळू शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Oct 19, 2019 11:09 AM IST

ताज्या बातम्या