धोनीच्या या पाच निर्णयांनी साऱ्यांनाच केले होतं थक्क

महेंद्रसिंग धोनी रिटायर होणार का याची कुजबुज सुरू असतानाच आॅस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड दौऱ्यासाठी धोनीची निवड झाली आहे. T20 आणि वन डे दोन्हीमध्ये त्याला संधी मिळणार आहे. धोनीच्या कमबॅकमुळे त्याचे चाहते खुश आहेत. या कॅप्टन कुलच्या कारकिर्दीत हे 5 निर्णय नेहमीच स्पेशल ठरले होते. वेस्ट इंडीज दौऱ्यात टी-20 मालिकेत धोनीला बाहेर बसवण्यात आलं होतं. त्याचबरोबर आॅस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिकेतही धोनीला संधी देण्यात आली नव्हती. त्यामुळे धोनीचं क्रिकेट करिअर संपलं की काय अशी चर्चा रंगली होती. परंतु, आज सोमवारी बीसीसीआयनं या चर्चांना पूर्णविराम लगावत धोनीला भारतीय टीममध्ये पुन्हा खेळण्यासाठी संधी दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Dec 24, 2018 10:18 PM IST

धोनीच्या या पाच निर्णयांनी साऱ्यांनाच केले होतं थक्क

धोनीने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये तोंडात भोट घालायला लावतील असे निर्णय घेतले आहेत. त्याच्या याच निर्णयांमुळे तो आज भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो.

धोनीने आपल्या क्रिकेट करिअरमध्ये तोंडात भोट घालायला लावतील असे निर्णय घेतले आहेत. त्याच्या याच निर्णयांमुळे तो आज भारताचा यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो.


नवख्या टीमसोबत जिंकला टी-20 वर्ल्ड कप- 2007 टी- 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीने धुरा सांभाळली होती. धोनीच्या या टीममध्ये युवा खेळाडूंचा भरणा होता. याच सामन्याच्या शेवटच्या षटकात त्याने अष्टपैलू खेळाडू जोगिंदर शर्माला गोलंदाजी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. पण त्याचा हा निर्णय किती योग्य होता ते शेवटी अख्या जगाला कळलेच.

नवख्या टीमसोबत जिंकला टी-20 वर्ल्ड कप-
2007 टी- 20 वर्ल्ड कपमध्ये भारताचा कर्णधार म्हणून महेंद्रसिंग धोनीने धुरा सांभाळली होती. धोनीच्या या टीममध्ये युवा खेळाडूंचा भरणा होता. याच सामन्याच्या शेवटच्या षटकात त्याने अष्टपैलू खेळाडू जोगिंदर शर्माला गोलंदाजी देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. पण त्याचा हा निर्णय किती योग्य होता ते शेवटी अख्या जगाला कळलेच.


संपूर्ण टीमसोबत पत्रकार परिषदेला हजेरी- 2009 मध्ये झालेल्या दुसऱ्या टी- 20 वर्ल्ड कपच्या पत्रकार परिषदेत धोनी संपूर्ण टीमसोबत पोहोचला होता. धोनी आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यात विस्तवही जात नाही असे म्हटले जात होते. मात्र यात कोणतेही तथ्य नसल्याचे दाखवण्यासाठीच धोनी संपूर्ण टीमसोबत पत्रकार परिषदेला हजर राहिला होता.

संपूर्ण टीमसोबत पत्रकार परिषदेला हजेरी-
2009 मध्ये झालेल्या दुसऱ्या टी- 20 वर्ल्ड कपच्या पत्रकार परिषदेत धोनी संपूर्ण टीमसोबत पोहोचला होता. धोनी आणि वीरेंद्र सेहवाग यांच्यात विस्तवही जात नाही असे म्हटले जात होते. मात्र यात कोणतेही तथ्य नसल्याचे दाखवण्यासाठीच धोनी संपूर्ण टीमसोबत पत्रकार परिषदेला हजर राहिला होता.

Loading...


वर्ल्डकपमध्ये युवराज सिंगच्या आधी स्वतः फलंदाजीला येणं- सामन्याचा निर्णय बदलण्याची ताकद धोनीच्या खेळात आहे असे म्हटले जाते. त्याने आतापर्यंत अशक्य वाटतील असे सामने तणावात असूनही भारताला जिंकून दिले आहेत. 2011 वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेविरोधातील अंतिम सामन्यात फॉर्ममध्ये असलेल्या युवराजआधी स्वतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सामन्याच्या शेवटच्या षटकात त्याने जोरदार षटकार लगावत 28 वर्षांनंतर भारताला वर्ल्डकप जिंकून दिला.

वर्ल्डकपमध्ये युवराज सिंगच्या आधी स्वतः फलंदाजीला येणं-
सामन्याचा निर्णय बदलण्याची ताकद धोनीच्या खेळात आहे असे म्हटले जाते. त्याने आतापर्यंत अशक्य वाटतील असे सामने तणावात असूनही भारताला जिंकून दिले आहेत. 2011 वर्ल्डकपमध्ये श्रीलंकेविरोधातील अंतिम सामन्यात फॉर्ममध्ये असलेल्या युवराजआधी स्वतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि सामन्याच्या शेवटच्या षटकात त्याने जोरदार षटकार लगावत 28 वर्षांनंतर भारताला वर्ल्डकप जिंकून दिला.


ऑस्ट्रेलियात असताना कसोटी क्रिकेटमधून संन्यास- कसोटी क्रिकेटमधून ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळत असतानाच कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय तडका फडकी घेतला. त्याच्या या निर्णयाने क्रिकेट विश्वात खळबळ माजली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला होता.

ऑस्ट्रेलियात असताना कसोटी क्रिकेटमधून संन्यास-
कसोटी क्रिकेटमधून ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका खेळत असतानाच कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेण्याचा निर्णय तडका फडकी घेतला. त्याच्या या निर्णयाने क्रिकेट विश्वात खळबळ माजली होती. ऑस्ट्रेलियाविरुद्धचा तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर त्याने हा निर्णय घेतला होता.


योग्य वेळी कर्णधारपद सोडणे एक यशस्वी कर्णधार असतानाच महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. धोनीने एकदिवसीय आणि टी- 20 क्रिकेटच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला. धोनी भारताचा असा कर्णधार आहे ज्याने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि संघाला दोन वर्ल्ड कप जिंकून दिले. 4 जानेवारी 2017 मध्ये धोनीने कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेतला.

योग्य वेळी कर्णधारपद सोडणे
एक यशस्वी कर्णधार असतानाच महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतला. धोनीने एकदिवसीय आणि टी- 20 क्रिकेटच्या कर्णधार पदाचा राजीनामा दिला. धोनी भारताचा असा कर्णधार आहे ज्याने चॅम्पियन्स ट्रॉफी आणि संघाला दोन वर्ल्ड कप जिंकून दिले. 4 जानेवारी 2017 मध्ये धोनीने कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेतला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 19, 2018 04:32 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...