• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • Fit India Movement : क्रिकेटमधील Yo-Yo Test विषयी मोदींनी विराटला विचारला सवाल, वाचा काय आहे टेस्टची आवश्यकता

Fit India Movement : क्रिकेटमधील Yo-Yo Test विषयी मोदींनी विराटला विचारला सवाल, वाचा काय आहे टेस्टची आवश्यकता

मोदी सरकारचे फिट इंडिया (Fit India Movement) अभियान सुरू होऊन वर्ष पूर्ण झाले आहे. दरम्यान याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित कार्यक्रमामध्ये देशभरातील अशाकाही व्यक्तींशी संवाद साधला आहे, ज्यांनी फिटनेसला महत्त्वाचे स्थान दिले आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 24 सप्टेंबर : मोदी सरकारचे फिट इंडिया (Fit India Movement) अभियान सुरू होऊन वर्ष पूर्ण झाले आहे. दरम्यान याप्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोजित कार्यक्रमामध्ये जनतेशी संवाद साधला. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यावेळी देशभरातील अशाकाही व्यक्तींशी संवाद साधला आहे, ज्यांनी फिटनेसला महत्त्वाचे स्थान दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी क्रिकेटपटू विराट कोहली (Virat Kohli), अभिनेता मिलिंद सोमण (Milind Soman) त्याचप्रमाणे न्यूट्रिशनिस्ट रुजूता दिवेकर (Rujuta Divekar) यांच्याशी बातचीत केली. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रातील फिटनेसचे महत्त्व वाढवणाऱ्या व्यक्तींशी पंतप्रधानांनी संवाद साधला. यावेळी विराट कोहलीने त्याचा अनुभव सांगितला. तो असे म्हणाला की, 'जेव्हापासून आम्ही खेळण्यास सुरुवात केली त्यावेळी खेळासाठी असणारी मागणी खूप वेगाने बदलली. त्यावेळचे रुटिन खेळाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी योग्य नव्हते. ते बदलणे गरजेचे होते. कारण आमचा खेळ खूप वेगाने पुढे जात होता आणि मला असे वाटले की आपण फिटनेटच्या दृष्टीने थोडे मागे पडतोय.' (हे वाचा-देशाचं नाव रोशन करणारी 'हिंदूस्तानी जलपरी', Google Doodleच्या माध्यमातून सन्मान) तो पुढे म्हणाला की, 'त्यानंतर फिटनेसकडे प्राथमिकतेने लक्ष देणे गरजेचे असल्याचे मला जाणवले. खेळ चांगला करण्यासाठी मी फिटनेस सुरु केला. पण आज प्रॅक्टिस चुकली तर मला वाईट नाही वाटत पण फिटनेस सेशन मिस झाल्यास जास्त वाईट वाटते.' फिटनेस बदलल्यावर दिल्लीतील छोले-भटूरेबाबत वाइट वाटले का असा प्रश्न विचारल्यावर क्षणार्धात विराटने हो म्हटले. तो असे देखील म्हणाला की स्थानिक पदार्थ खाल्ल्याने कोणत्याही समस्या येत नाही. पण बाहेरचे खाणे वाढल्यामुळे फिजिकल फिटनेस आणि डाएट सुरू करावे लागले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विराट कोहलीली यो-यो टेस्टविषयी (Yo-Yo Test) विषयी सवाल केला. विराटने याबाबत असे म्हटले की, टीमसाठी ही चाचणी खूप महत्त्वाची असते. यामुळे फिटनेस लेव्हल सातत्याने राहते. तो असे देखील म्हणाला की जगभरातील इतर टीम्सचा सामना करण्यासाठी आम्हाला फिट राहणे अत्यंत गरजेचे आहे. यो-यो टेस्ट आवश्यक आहे कारण मी यामध्ये फेल झाल्यास टीममध्ये निवड होणार नाही. (हे वाचा-कोहलीला दणका! 10 कोटींना विकत घेतलेला 'हा' खेळाडू IPL मधून घेणार माघार?) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी फिट इंडिया अभियानाच्या वर्षपूर्तीनिमित्त सर्वांच्या स्वास्थ्याविषयी प्रार्थना केली. त्यांनी असे म्हटले की, योग आणि साधे जेवळ आपली सवय बनत आहे. 'फिटनेस का डो़ज, आधा घंटा रोज' हा कानमंत्र यावेळी पंतप्रधानांनी दिला. दरम्यान फिट इंडिया अभियानाची वर्षपूर्ती साजरी करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऑनलाइन कार्यक्रमामध्ये Fit India Age Appropriate Fitness Protocols लाँच केले.
  Published by:Janhavi Bhatkar
  First published: