क्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला!

क्रिकेट वर्ल्डकपचा भारताचा पहिला सामना 5 जून 2019ला!

२०१९ मध्ये होणाऱ्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा पहिला सामना २ जूनऐवजी ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे.

  • Share this:

25 एप्रिल : पुढचं वर्ष म्हणजे 2019 हे क्रिकेटप्रेमींसाठी महत्त्वाचं आहे. कारण आहे जागतिक विश्व चषक स्पर्धेचं. २०१९ मध्ये होणाऱ्या आयसीसी क्रिकेट वर्ल्डकपमध्ये भारतीय संघाचा पहिला सामना २ जूनऐवजी ५ जून रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. आयपीएलचा अंतिम सामना आणि आंतरराष्ट्रीय सामना यात १५ दिवसांचं अंतर असावं, अशी शिफारस लोढा समितीने केली. त्यानुसारच वर्ल्डकपमधील भारताच्या सामन्यांचे वेळापत्रक बदलण्यात आले आहे.

कोलकाता येथे आयसीसीची पाच दिवसीय चीफ एक्झिक्युटिव्ह मीटिंग सुरू आहे.  या बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला. भारताचा पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानशी आता १६ जून रोजी मँचेस्टरमध्ये टक्कर होणार आहे, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

त्यामुळे थोड्या तारखा कळल्या तरी तुम्हाला सुट्टीचा प्लान नक्कीच करता येईल.

First published: April 25, 2018, 11:20 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading