IND vs AUS : 32 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावर ओढावली नामुष्की, बालेकिल्ल्यातच लोटांगण

IND vs AUS : 32 वर्षांनंतर ऑस्ट्रेलियावर ओढावली नामुष्की, बालेकिल्ल्यातच लोटांगण

भारताने (Team india) चौथ्या कसोटी सामन्यात (4th test match) ऑस्ट्रेलियन संघाला (Australia) धुळ चारत त्यांचं ऐतिहासिक वर्चस्व (historic win) मोडीत काढलं आहे. गेल्या 32 वर्षांत ऑस्ट्रेलिया या मैदानावर कधीही पराभूत झाली नव्हती.

  • Share this:

ब्रिस्बेन, 19 जानेवारी: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध (India vs Australia) ब्रिस्बेनमध्ये झालेल्या चौथ्या टेस्टमध्ये ऐतिहासिक विजय  मिळवून मालिका 2-1 फरकाने जिंकली आहे. भारताने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीवर (Border Gavaskar trophy) पुन्हा एकदा आपलं नाव कोरलं आहे. लक्ष्याचा पाठलाग करत असताना  भारताला 328 धावांची आवश्यकता होती. शुभमन गिलच्या उत्कृष्ठ खेळीमुळे भारताची सुरुवात चांगली झाली होती. त्यामुळे भारताला या सामन्यात लय गवसली आणि एकीचे बळ दाखवत भारताने ऐतिहासिक विजय मिळवला. कारण गेल्या 32 वर्षांपासून ब्रिस्बेनच्या या मैदानावर ऑस्ट्रेलियन संघाने आपलं एकतर्फी वर्चस्व कायम राखलं होतं.

भारताने चौथ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाला धुळ चारत त्यांचं ऐतिहासिक वर्चस्व मोडीत काढलं आहे. म्हणून या विजयाचं महत्त्व वाढतं. गेल्या 32 वर्षांत ऑस्ट्रेलिया या मैदानावर कधीही पराभूत झाली नव्हती. त्यामुळे त्यांच्या बालेकिल्ल्यात यजमान संघाला चारी मुंड्या चित करण्याची कामगिरी भारताच्या तरुण शिलेदारांनी करून दाखवली आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाला वेस्ट इंडिजकडून 1988 मध्ये पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर तब्बल 32 वर्षे ऑस्ट्रेलिया या मैदानात पराभूत झाली नव्हती.

1988 पासून या मैदानावर 31 सामने खेळले गेले

1988 पासून ऑस्ट्रेलियाने या मैदानावर एकूण 31 सामने खेळले आहेत. यातील 24 सामने ऑस्ट्रेलियाने जिंकले आहे, तर उरलेले 7 सामने अनिर्णित राहिले आहेत. ऋषभ पंतने विजयी चौकार लावून भारताच्या खेम्यात विजय खेचून आणला. टीम इंडियाच्या या कामगिरीवर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Published by: News18 Desk
First published: January 19, 2021, 3:17 PM IST

ताज्या बातम्या