S M L

भारत- इंग्लंडमध्ये आज रंगणार पहिला टी-20 सामना, जाणून घ्या या खास गोष्टी

सामन्याला सुरूवात होण्यापूर्वीच भारताला काही धक्के बसले आहेत. जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर दोघेही दुखापतग्रस्त झाल्याने ते हा सामना खेळणार नाहीत

Sonali Deshpande | Updated On: Jul 3, 2018 03:40 PM IST

भारत- इंग्लंडमध्ये आज रंगणार पहिला टी-20 सामना, जाणून घ्या या खास गोष्टी

मुंबई, 03 जुलै : आज संध्याकाळी भारत आणि इंग्लंडदरम्यान टी-20 मालिकेतील पहिला सामना मॅनचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफॉर्ड ग्राऊंडवर खेळण्यात येणार आहे. तीन टी२० सामन्यांच्या मालिकेनंतर तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळवण्यात येणार आहे. त्यानंतर पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळविण्यात येणार आहे. सुरूवातीपासूनच अनेकांचे या सामन्याकडे लक्ष लागून राहिले आहे. सामन्याला सुरूवात होण्यापूर्वीच भारताला काही धक्के बसले आहेत. जसप्रीत बुमराह आणि वॉशिंग्टन सुंदर दोघेही दुखापतग्रस्त झाल्याने ते हा सामना खेळणार नाहीत. सामना सुरू होण्यापूर्वी दोन्ही संघाच्या आतापर्यंतच्या कामगिरीकडे लक्ष टाकू.

- आयसीसी टी- 20च्या क्रमवारीत भारत दुसऱ्या स्थानावर आहे तर इंग्लंड चौथ्या स्थानावर आहे.

- आतापर्यंत भारत आणि इंग्लंड दरम्यान 11 टी- 20 सामने खेळण्यात आले. यातील 5 सामने भारताने जिंकले असून 6 सामन्यावर इंग्लंडने विजय संपादन केला आहे.

- भारताविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यांमध्ये सर्वात जास्त धावा इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनने केल्या होत्या. मॉर्गनने 8 सामन्यांमध्ये ऐकूण 284 धावा केल्या होत्या. तर भारताकडून 10 सामन्यांमध्ये सर्वाधिक 265 धावा सुरेश रैनाने केल्या होत्या. रैनानंतर धोनीने इंग्लंडविरुद्ध 11 सामन्यांमध्ये 264 धावा केल्या होत्या.

- इंग्लंडविरोधात खेळण्यात आलेल्या गेल्या तीन सामन्यांमध्ये हरभजन सिंगने 8 गडी बाद केले होते. असे असले तरी या मालिकेत हरभजनला स्थान देण्यात आले नाही. चहलनेही 3 सामन्यांमध्ये 8 गडी बाद केले होते.

Loading...
Loading...

- डर्बनमध्ये 2007 मध्ये खेळण्यात आलेल्या टी- 20 सामन्यामध्ये भारताने इंग्लंडविरोधात सर्वाधिक धावा नोंदवल्या होत्या. भारताने या सामन्यात 4 गडी गमावत 218 धावा केल्या होत्या. या सामन्यात इंग्लंडला मात्र फक्त 200 धावा करता आल्या होत्या.

- 2014 मध्ये दोन संघांमध्ये खेळवण्यात आलेल्या टी-20 सामन्यात इंग्लंडचा कर्णधार मॉर्गनने सर्वाधिक धावा केल्या होत्या. मॉर्गनने 31 चेंडूत 71 धावा केल्या होत्या. तर 2017 मध्ये भारताकडून केएल राहूलने 47 चेंडूत 71 धावा केल्या होत्या.

हेही वाचा: 

...जेव्हा सचिननं घातली शाहरुखला 'टोपी'!

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 3, 2018 02:48 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close