मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /क्वालिफायर 1मध्ये बॉलर्सचे पर्यावरणासाठी मोठे योगदान, BCCI लावणार 42 हजार झाडे

क्वालिफायर 1मध्ये बॉलर्सचे पर्यावरणासाठी मोठे योगदान, BCCI लावणार 42 हजार झाडे

बीसीसीआय लावणार 42 हजार झाडे

बीसीसीआय लावणार 42 हजार झाडे

बीसीसीआय आणि टाटा कंपनीने एक कौतुकास्पद पाऊल उचलताना प्लेऑफच्या चार सामन्यात जितके डॉट चेंडू पडतील त्या प्रत्येक चेंडूसाठी 500 झाडे लावण्याचा निर्णय घेतला आहे.

चेन्नई, 24 मे : आयपीएल 2023 मध्ये आता प्लेऑफमधील सामने सुरू आहेत. पहिल्या क्वालिफायरमध्ये गुजरात टायटन्सला हरवून चेन्नई सुपर किंग्जने फायनलमध्ये धडक मारलीय. तर आज एलिमिनेटर सामना होणार आहे. दरम्यान, चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यानंतर बीसीसीआय आणि टाटा कंपनी मिळून 42 हजार झाडे लावणार आहे. याची माहिती बीसीसीआय सचिव जय शहा यांनी दिली.

आयपीएलचे यंदाचे मुख्य प्रायोजक टाटा कंपनी आहे. बीसीसीआय आणि टाटा कंपनीने एक कौतुकास्पद पाऊल उचलताना प्लेऑफच्या चार सामन्यात जितके डॉट चेंडू पडतील त्या प्रत्येक चेंडूसाठी 500 झाडे लावण्याचा निर्णय घेतला. पहिल्या क्वालिफायरमध्ये एकूण 84 डॉट चेंडू पडले. त्यानुसार 42 हजार झाडे लावली जाणार आहेत. सामन्यावेळी प्रत्येक डॉट चेंडूवेळी झाडाचे इमोजी दिसत होते.

VIDEO : धोनीच्या जाळ्यात अलगद फसला हार्दिक पांड्या, एक फिल्डर बदलला अन्... 

बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी बुधवारी ट्विटरवरून याची माहिती दिली की, आम्ही आयपीएलमध्ये प्रत्येक डॉट बॉलला 500 झाडे लावणार आहोत. टाटा ग्रुपसोबत आम्ही हे काम करणार असून याचा आम्हाला अभिमान आहे. चेन्नई विरुद्ध गुजरात यांच्यातील सामन्यात एकूण 84 डॉट बॉलच्या बदल्यात 42 हजार झाडे लावली जाणार आहेत. कोण म्हणतं टी20 फलंदाजांचा खेळ आहे. गोलंदाजांसाठीही आहे आणि आता हे तुमच्या हातात आहे.

प्ले-ऑफच्या पहिल्या सामन्यामध्ये चेन्नईने गुजरातचा 15 रननी पराभव केला आहे. चेन्नईने दिलेल्या 173 रनच्या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातचा 20 ओव्हरमध्ये 157 रनवर ऑलआऊट झाला. शुभमन गिलने सर्वाधिक 42 रन केल्या तर राशिद खान 30 रनवर आऊट झाला. या दोघांशिवाय गुजरातच्या इतर कोणत्याही खेळाडूला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. चेन्नईकडून दीपक चहर, महीश तीक्षणा, रवींद्र जडेजा आणि पथिराणा यांना प्रत्येकी 2-2 विकेट मिळाल्या, तर तुषार देशपांडेला एक विकेट घेण्यात यश आलं.

First published:
top videos

    Tags: IPL 2023