भारताचं 'ऐश्वर्य'! मोटरस्पोर्ट्समध्ये वर्ल्ड कप जिंकणारी देशातील पहिलीच महिला

23 वर्षीय ऐश्वर्यानं मोठ्या अपघातातून बचावल्यानंतर पुनरागमन करत मोटरस्पोर्ट्स प्रकारातला वर्ल्ड कप जिंकला.

News18 Lokmat | Updated On: Aug 13, 2019 01:02 PM IST

भारताचं 'ऐश्वर्य'! मोटरस्पोर्ट्समध्ये वर्ल्ड कप जिंकणारी देशातील पहिलीच महिला

दुबई, 13 ऑगस्ट : मोटरस्पोर्ट्स सारख्या खेळात आपल्या देशातील खेळाडू कमीच दिसतात. या क्रीडा प्रकारात भारताच्या 23 वर्षीय महिला खेळाडूने वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला आहे. बेंगळुरूच्या ऐश्वर्या पिस्सायनं मोटस्पोर्ट्सचा वर्ल्ड कप जिंकून अशी कामगिरी करणारी पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे.

ऐश्वर्यानं 2017 मध्ये झालेल्या अपघातातून सावरत ही कामगिरी नोंदवली आहे. भारताला या प्रकारात विजेतेपद मिळवून देणं अभिमानास्पद असल्याचं ऐश्वर्या म्हणाली. तिनं ज्यूनिअर कॅटेगरीत दुसरं स्थान पटकावलं होतं.

FIM वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद पटकावणारी ऐश्वर्या पहिलीच भारतीय महिला ठरली आहे. दुबईत झालेल्या पहिल्या फेरीत तिनं बाजी मारली होती. पोर्तुगालमध्ये तिसऱ्या , स्पेनमध्ये पाचव्या, हंगेरीत चौथं स्थान पटकावलेल्या ऐश्वर्यानं स्पर्धेत 65 गुण पटकावले.

हंगेरीत सहभागी होण्यापूर्वी ऐश्वर्या आणि व्हिएरा यांच्यात चुरस रंगली होती. हंगेरीत ऐश्वर्यानं 13 गुण मिळवले तर व्हिएरानं 16 गुण मिळवले. मात्र, आधीच्या टप्प्यात मिळवलेल्या गुणांच्या जोरावर ऐश्वर्यांनं बाजी मारली.

Loading...

दोन मोठ्या अपघातातून बचावलेल्या ऐश्वर्यानं जबरदस्त पुनरागमन केलं. तिची सर्जरी झाली होती. जवळपास दोन महिने रुग्णालयात रहावं लागलेल्या ऐश्वर्याच्या कॉलरबोन तुटलं होतं. ते जोडण्यासाठी स्टीलची प्लेट आणि सात स्क्रू लावण्यात आले होते.

SPECIAL REPORT : लोकांची मनं जिंकण्यासाठी मोदींच्या जेम्स बॉन्डचं 'मिशन काश्मीर'

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: sport
First Published: Aug 13, 2019 01:02 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...