जेव्हा एक क्रिकेटपटू थेट बाबासाहेबांच्या विरोधात निवडणुकीला उभा राहतो तेव्हा...

जेव्हा एक क्रिकेटपटू थेट बाबासाहेबांच्या विरोधात निवडणुकीला उभा राहतो तेव्हा...

1937मध्ये कॉंग्रेसकडून मैदानात थेट एक हुकुम एक्का बाबासाहेबांच्या विरोधात विधानसभेत उतरवण्यात आला होता.

  • Share this:

नवी दिल्ली, 21 मे : लोकसभा निवडणुकीच्या मतदानानंतर सध्या सर्वत्र चर्चा आहे ती एक्झिट पोलची. कारण एक्झिट पोलच्या सर्व्हेनुसार अब की बार मोदी सरकारचं येणार असे संकेत दिसले असले तरी सध्या दिल्लीत सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने हलचाली सुरु झाल्या आहेत. निवडणुकीचा निकाल 23 मे रोजी लागणार असला तरी त्याआधी दिल्लीत राजकीय वातावरण तापले आहे. दरम्यान यंदाच्या निवडणुकीत आकर्षणाचे विषय ठरले ते, अभिनेत्री, अभिनेते आणि क्रिकेटपटू.

क्रिकेटचे मैदान गाजवणारे क्रिकेटर निवृत्तीनंतर कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात शिरकाव करतात. त्यातले बरेचजण राजकारणाच्या मैदानात उतरतात. 2019च्या लोकसभा निवडणुकीतही भारताचा माजी खेळाडू गौमत गंभीरनं राजकारणात प्रवेश केला. भाजपमध्ये पक्ष प्रवेश केल्यानंतर पूर्व दिल्लीतून गंभीरला उमेदवाराही देण्यात आली. गंभीरनं 2007 टी-20 वर्ल्ड कप आणि 2011 वर्ल्ड कपमध्ये महत्त्वाची भुमिका बजावली होती. मात्र क्रिकेटच्या मैदानातून थेट राजकारणात प्रवेश करणारा गंभीर हा काही पहिला खेळाडू नाही. तर, सगळ्यात आधी 1933-34च्या निवडणुकीत पहिल्यांदा एका क्रिकेटपटूनं राजकारणाच्या मैदानात प्रवेश केला होता. इतिहासकार रामचंद्र गुहा यांनी आपल्या पुस्तकात केलेल्या नोंदीनुसार, बाळू पालवणकर हे पहिले क्रिकेटपटू होते, ज्यांनी राजकारणात प्रवेश केला होता. दलित नेता म्हणून ओळख असलेले बाळू पालवणकर मुंबईच्या पालिका निवडणुकीत लढले होते. मात्र त्यांना पारसी डॉक्टर होमी पर्वी यांच्याकडून पराभव स्विकारावा लागला होता.

एवढेच नाही तर, 1937मध्ये कॉंग्रेसकडून मुंबई विधानसभा निवडणुकीच्या मैदानात बबलू थेट उतरले ते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात. त्यांनी बाबासाहेबांना चांगलीच लढत दिली होती. बाबासाहेबांविरोधात त्यांना केवळ 2000 मतांनी पराभव स्विकारावा लागला होता. त्यानंतर त्यांनी कोणतीही निवडणुक लढली नाही. दरम्यान त्यांनतर भारताच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदा जर कोणी क्रिकेटर राजकारणाच्या मैदानात उतरला असेल तर ते आहेत. नवाब मन्सुर अली खान पतौडी. भारताचे महान फलंदाज आणि पहिले कर्णधार शुमार मंसूर अली खान पतौडी यांनी दोनवेळा लोकसभा लढवली. सुरुवातीला विशाल हरयाणा पक्षानं 1971साली गुडगावमधून निवडणुक लढवली. त्यानंतर कॉंग्रेसनं टायगर पतौडी यांना 1991मध्ये भोपाळमध्ये उतरवलं. मात्र दोन्ही ठिकाणी त्यांना पराभव स्विकारावा लागला.

वाचा- राजकारणाच्या खेळपट्टीवर काही क्रिकेटपटूंचा सिक्सर तर काही थेट बाद !

वाचा- मतदान केलं म्हणून दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून केली हत्या

वाचा- एक्झिट पोलनंतर ही दोन राज्य सरकारं आली संकटात

VIDEO: निकालाआधीच भाजप समर्थकांकडून विजयोत्सवाची जंगी तयारी

First published: May 21, 2019, 4:02 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading