DDCAचा मोठा निर्णय, फिरोज शाह कोटला मैदानाचे नाव बदलणार!

DDCAचा मोठा निर्णय, फिरोज शाह कोटला मैदानाचे नाव बदलणार!

दिल्लीच्या सर्वात मोठ्या फिरोजशाह कोटला मैदानाचे नाव बदलण्यात येणार आहे. DDCAनं हा निर्णय घेतला आहे.

  • Share this:

दिल्ली, 27 ऑगस्ट : दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट संघ (DDCA)ने एक मोठा निर्णय घेतला आहे. दिल्लीच्या सर्वात मोठ्या फिरोजशाह कोटला मैदानाचे नाव बदलण्यात येणार आहे. डीडीसीएचे सध्याचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी नुकतीच, फिरोजशाह कोटला मैदानाला भाजपचे दिवंगत नेते अरुण जेटली यांचे नाव देण्यात येणार आहे. 12 डिसेंबरला कोटला मैदानावर एक कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. यावेळी कोटला स्टेडियमला अरुण जेटली (Arun Jaitely Stadium) असे नाव देण्यात येणार आहे.

जेटली यांचा डीडीसीएकडून सन्मान

डीडीसीएचे अध्यक्ष रजत शर्मा यांनी, “ज्या व्यक्तिच्या संरक्षणामुळं मैदान तयार करण्यात आले. त्या मैदानाला त्याच व्यक्तिचे नाव देणे यापेक्षा मोठे काय आहे”, असे सांगितले. यावेळी रजत यांनी, “अरुण जेटली यांनी जे काम केले आहे, त्यामुळं दिल्ली क्रिकेटचा स्थर उंचावला आहे. त्यांच्यामुळं विराट कोहली, विरेंद्र सेहवाग, गौतम गंभीर, आशिष नेहरा आणि ऋषभ पंत यांच्यासारखे खेळाडू भारतीय संघाला मिळाले”, असे सांगितले.

माजी अर्थमंत्री आणि भाजप नेते अरुण जेटली यांचे 24 ऑगस्टला प्रदीर्घ काळापासून आजारी असलेले यांनी आज अखेरचा श्वास घेतला. राजकारणाबरोबरच अरूण जेटली यांचे खेळासोबतही खुप जवळचे संबंध होते. जेटली 1999 ते 2013 पर्यंत दिल्ली जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष होते. त्यामुळं क्रिकेट आणि त्यांचा खुप जवळचा संबंध होता.

अरुण जेटली आणि क्रिकेट यांचे संबंध

अरुण जेटली जवळजवळ 13 वर्ष दिल्ली क्रिकेट असोशिएशनचे अध्यक्ष होते. त्यांनी 1999 ते 2012मध्ये डीडीसीएसचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले. भारतीय क्रिकेट संघातील अनेक खेळांडूनसाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे. गौतम गंभीर, विरेंद्र सेहवाग, विराट कोहली, शिखर धवन आणि इशांत शर्मा यांनी दिल्लीतून खेळण्यास सुरुवात केली.

गौतम गंभीरनं केली होती मागणी

जेटली यांच्या निधनानंतर सोशल मीडियावर अनेकांनी दु:ख व्यक्त केले. यात भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरनं ट्विटरवरून दु:ख व्यक्त केले. गंभीरनं, “वडिल तुम्हाला बोलायला शिकवतात, मात्र तुमच्या आयुष्यात जी व्यक्त पित्या समान असते ती तुम्हाला जीवनाच कसे वागायचे हे शिकवते. वडिल तुम्हाला नाव देतात, पण पित्या समान व्यक्ती तुम्हाला ओळख देतात. आज मी माझ्या पित्या समान व्यक्तीला गमावले. माझ्या शरीरातील एक भाग आज निखळला. सर, तुमच्या आत्म्यास शांती लाभो’, असे ट्वीट केले. तसेची गंभीरनं कोटला मैदानाला जेटलींचे नाव देण्याची मागणी केली होती.

VIDEO:11 हजार व्होल्ट तीव्र विजेच्या तारेला अडकलं चार्टर्ड विमान, त्यांनतर काय झालं तुम्हीच पाहा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 27, 2019 04:34 PM IST

ताज्या बातम्या