मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

खळबळजनक! अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पाकिस्तानी क्रिकेटपटूवर एफआयआर दाखल

खळबळजनक! अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पाकिस्तानी क्रिकेटपटूवर एफआयआर दाखल

पाकिस्तान क्रिकेटमधून खळबळजनक वृत्त समोर येत आहे. पाकिस्तानचा क्रिकेटपटू यासिर शाह (Yasir Shah) आणि त्याच्या मित्रांवर 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आणि धमकावल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे.

  • Published by:  Shreyas

इस्लामाबाद, 20 डिसेंबर : पाकिस्तान क्रिकेटमधून खळबळजनक वृत्त समोर येत आहे. पाकिस्तानचा क्रिकेटपटू यासिर शाह (Yasir Shah) आणि त्याच्या मित्रांवर 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी आणि धमकावल्याप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस आता या अल्पवयीन मुलीची मेडिकल टेस्ट करण्याच्या तयारीत आहे. मेडिकल टेस्टच्या रिपोर्टनंतर पुढची कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही.

पाकिस्तानमधल्या आज न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार यासिर शाहचा मित्र फरहानने एका 14 वर्षांच्या मुलीवर बलात्कार केला आणि तिचा एक व्हिडिओ बनवला, त्यानंतर फरहानने मुलीचं यासिर शाहसोबत बोलणं करून दिलं. एफआयआरमध्ये यासिरने मुलीला धमकी देऊन गप्प राहण्यासाठी सांगितलं. एवढच नाही तर तिच्यावर फरहानसोबत लग्न करण्यासाठीही दबाव आणला. मेडिकल टेस्टनंतरच पुढची कारवाई केली जाईल.

यासिर शाहच्या आधी पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम (Babar Azam) याच्यावरही बलात्काराचे आरोप झाले होते, पण त्याच्यावरचे आरोप सिद्ध झाले नव्हते. दुखापतीमुळे यासिर शाह बांगलादेश दौऱ्यावर (Bangladesh vs Pakistan) गेला नव्हता. या दौऱ्यातल्या टेस्ट सीरिजमध्ये 2-0 ने विजय मिळवला होता.

First published: