अरेच्चा! या क्रिकेटपटूचं आडनाव वाचता वाचता लागेल दम, बघा तुम्हाला तरी जमतंय का?

अरेच्चा! या क्रिकेटपटूचं आडनाव वाचता वाचता लागेल दम, बघा तुम्हाला तरी जमतंय का?

क्रिकेटपटूचं आडनाव आहे की बारा डब्ब्यांची गाडी! हे आडनाव एकदा वाचून दाखवाच.

  • Share this:

क्रिकेट जगतात क्रिकेटपटूची खरी ओळख ही त्यांच्या रेकॉर्ड्समुळे होते. मात्र एका क्रिकेटपटूनं आपल्या आडनावानं फक्त गिनीज वर्ल्ड कप रेकॉर्ड केला. हे वाचून तुम्हाला विश्वास बसणार नाही.पण हे खरं आहे. या क्रिकेटपटूचं आडनाव म्हणजे जणू बारा डब्ब्यांची गाडीच. त्याचे आडनाव एवढे मोठे आहे की त्याच्या नावावर हा एक विक्रमच आहे.

फिजीचा क्रिकेटपटू आय. एल. बुला. क्रिकेटपटू बुला यांनी 1947-18 आणि 1953-54मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये खेळण्यास सुरुवात केली. त्यांचे नाव एवढे मोठे होते की, त्यांनी आय. एल. बुला असे टोपणनाव करून घेतले.

वाचा-कोरोनानंतर पहिल्यांदाच होणार क्रिकेट सामना, 8 जुलैपासून कसोटी मालिका सुरू

फिजीचे क्रिकेटपटू बुला यांचे खरे नाव आहे, Ilikena Lasarusa Talebulamaineiilikenamainavaleniveivakabulaimainakulalakebalau. हे नाव वाचताना तुम्हाला दम लागला असेल नाही. महत्त्वाची गोष्ट या आडनावाचा एक अर्थही आहे. हे आडनाव लाऊ बेटसमूहासंबंधात आहे. याचा अर्थ आहे, ‘लाऊ ग्रुपमधल्या (लाऊ भेटसमूह) लॅकेबा बेटावरच्या नंकुला हॉस्पिटलमधून जिवंत परत आला’. हे आडनाव वाचून तुम्हाला कळणार नाही की ही भानगड नक्की काय आहे. पण हे आडनाव फार जून्या काळातले आहे.

वाचा-युवीनं विराटला मागे टाकत विकत घेतलं सर्वात महागडं घर, किंमत वाचून डोळे फिरतील

बुला हे ज्या काळी खेळायचे तेव्हा असे विचित्र आडनाव कोणाचेच नव्हते. कारण उच्चारासाठी क्रिकेटपटूंचे आडनाव महत्त्वाचे असते. एवढेच नाही तर फिजीच्या क्रिकेट इतिहासातील बुला हे एकमेवाद्वितीय खेळाडू होते. त्यांनी फिजीसाठी 9 सामने खेळले आणि या सर्व सामन्यांमध्ये मैदान गाजवलं. त्यांच्या तुफान षटकारांनी त्यांना प्रसिद्धी मिळवून दिली.

वाचा-मोहम्मद शमीच्या पत्नीनं शेअर केला NUDE फोटो, पतीसाठी लिहिला खास मेसेज

First published: June 5, 2020, 9:35 PM IST
Tags: cricket

ताज्या बातम्या