FIH : भारतीय महिलांनी हॉकीत जग जिंकलय, जपानवर 3-1 ने मात

FIH Series Finals : गुरजित कौरने केलेल्या दोन गोलच्या बळावर भारतीय महिलांनी जपानवर विजय मिळवला.

News18 Lokmat | Updated On: Jun 24, 2019 02:16 PM IST

FIH : भारतीय महिलांनी हॉकीत जग जिंकलय, जपानवर 3-1 ने मात

हिरोशीमा, 24 जून : जपानमध्ये झालेल्या FIH Series Finals मध्ये भारताच्या महिला हॉकी संघाने यजमानांना पराभूत करून विजेतेपद पटकावलं. भारताने जपानवर 3-1 च्या गोल फरकाने विजय मिळवला. जपानने जोरदार प्रतिकार केला पण भारतीय महिलांनी त्यांना रोखत या विजयासह ऑलिम्पिक पात्रता फेरीत जागा पटकावली आहे. शनिवारी झालेल्या सेमीफायनलमध्ये चिलीला 4-2 पराभूत करून भारताने फायनलला धडक मारली होती.

भारताची कर्णधार राणी रामपालने तिसऱ्या मिनिटाला मिळालेल्या पेनाल्टी कॉर्नरवर गोल करून सामन्यात 1-0 ने आघाडी घेतली. त्यानंतर जपानच्या कानोन मोरीने 11 व्या मिनीटाला गोल करून बरोबरी साधली. त्यानंतर भारतीय महिलांनी आक्रमक खेळ करत जपानला गोल करण्याची संधी दिली नाही.

भारताच्या गुरजित कौरने शेवटच्या काही मिनिटांत गोलं केले. गुरजितने 45 व्या मिनिटाला गोल करून पुन्हा आघाडी मिळवून दिली. त्यानंतर जपानने चढाई करत गोल करण्याचा प्रयत्न केला पण भारताच्या बचाव फळीने हा प्रयत्न हाणून पाडला. शेवटी 60 व्या मिनिटाला मिळालेल्या पेनाल्टी कॉर्नरवर गोल करत गुरजितने निर्णायक गोल करत भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.

Loading...

World Cup : इंग्लंडच्या वाटेत इतिहासाचा अडथळा, स्पर्धेतून बाहेर होणार?

World Cup Point Table : पाकचा आफ्रिकेवर विजय, पाहा कोण कितव्या स्थानावर?

VIDEO: तरुणांचा माज, बारमध्ये गोळ्या झाडत सुरू होता डान्स

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: hockey
First Published: Jun 24, 2019 02:16 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...