S M L

भारत-पाकिस्तान मॅचचे रंगलेले किस्से

भारत-पाक मॅचमधले असेच काही राडे, भारत- पाकिस्तान क्रिकेट म्हणजे मैदानावरची लढाईच.आणि मग मॅच सोबत क्रिकेटरही तापतात.

Sonali Deshpande | Updated On: Jun 18, 2017 01:12 PM IST

भारत-पाकिस्तान मॅचचे रंगलेले किस्से

अमित मोडक, 18 जून : भारत-पाकिस्तान मॅच म्हणजे मैदानावरचं युद्धच. युद्ध म्हटल्यावर खेळाडूही मैदानावर भिडतात.  भारत-पाक मॅचमधले असेच काही राडे, भारत- पाकिस्तान क्रिकेट म्हणजे मैदानावरची लढाईच.आणि मग मॅच सोबत क्रिकेटरही तापतात.

जावेद मियाँदाद आणि किरण मोरेचं भांडण आजही हिट्ट आहे.त्यानंतरचा किस्स म्हणजे १९९६ वर्ल्डकपमध्ये आमिर सोहेल विरुद्ध व्यंकटेश प्रसाद, सोहेलच्या उडवलेल्या दांड्या आजही भारतीय चाहते विसरलेले नाहीत.

हरभजनसिंग आधीच पंजाबी त्यात त्याला डिवचलं ते शोएब अख्तरनं आणि मग मैदानातच राडा. गौतम गंभीरला डिवचल्यावर त्यानं मारलेला धक्का अजूनही आफ्रिदी विसरलेला नाही.राहुल द्रविड टीम इंडियातला सर्वात शांत खेळाडू. पण राहुल आणि शोएब अख्तरचेही मैदानात खटके उडाले. मैदानात भारत-पाक खेळाडूंचे खटके उडणं काही नवीन नाही. पण खेळाडू आणि फॅन्सही भिडलेत. सर्वात गाजलेला किस्सा म्हणजे इंजमाम उल हकला चिडल्यावर तो चक्क मारण्यासाठी स्टॅण्डमध्ये घुसला होता.

भारत-पाकिस्तान लढतींना तडका दिलाय तो मैदानातल्या या खटक्यांनी. त्यामुळे मॅच इतकेच हे किस्सेही क्रिकेट रसिकांच्या मनात  कायमचे कोरले गेलेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jun 18, 2017 01:12 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close