क्रिकेट बोर्डच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी हाणलं, VIDEO VIRAL

क्रिकेट बोर्डच्या बैठकीत अधिकाऱ्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी हाणलं, VIDEO VIRAL

भारतीय क्रिकेट विश्वाला लाजवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 29 डिसेंबर : भारतीय क्रिकेट विश्वाला लाजवणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नवी दिल्लीत जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या बैठकीत अधिकाऱ्यांमध्ये बाचाबाची झाली. हे भांडण एवढे टोकाला गेले की, अधिकाऱ्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारायला सुरुवात केली. DDCAच्या या बैठकीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताच सर्वत्र क्रिकेट संघटनांच्या कामकाजासह बीसीसीआयवरही प्रश्न उपस्थित झाले आहेत.

सौरव गांगुलीकडे केली कारवाईची मागणी

दरम्यान या सगळ्या प्रकाराचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीकडे बैठकीत दंगा करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याची मागणी केली आहे. क्रिकेटहा जेटलमन गेम म्हणून ओळखला जातो, असे असताना क्रिकेट बोर्डाच्या अशा कार्य प्रणालीवर गांगुली काय कारवाई करणार हे पाहणे महत्त्वाचे असेल. मिडिया रिपोर्टनुसार सहसचिव राजन मनचंदा इतर सदस्यांना धक्का दिला. वास्तविक बैठकीत काही अजेंडा राबविण्यात आला. मतभेद असूनही, अंमलबजावणीमुळे वातावरण बिघडले. दरम्यान, डीडीसीएचे नवे लोकपाल म्हणून न्यायमूर्ती दीपक वर्मा यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यासह नवीन अध्यक्ष पदाचा निर्णय 13 जानेवारी रोजी होणार आहे.

वाचा-टी-20 वर्ल्ड कपआधी टीम इंडियाला मोठा झटका, भुवनेश्वर कुमारला झाला गंभीर आजार

वाचा-ऑस्ट्रेलियामध्ये मैदानात दिसला ‘धोनी’ अवतार, स्टम्पिंगचा हा VIDEO पाहाच

रजत शर्मा यांनी सोडले होते पद

गेल्या महिन्यातच रजत शर्मा यांनी डीडीसीए अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता, त्यानंतर हे पद रिक्त झाले आहे. वास्तविक रजत शर्मा यांनी कोणत्याही किंमतीवर आपली सचोटीशी तडजोड करणार नाही असे सांगून हे पद सोडले. यामुळे, डीडीसीए प्रश्न अंतर्गत होते. गेल्या वर्षी जुलैमध्ये रजत शर्मा यांनी माजी क्रिकेटपटू मदन लाल यांना 517 मतांनी पराभूत करून हे पद भूषविले. त्यांचा 20 महिन्यांचा कार्यकाळ चढउतारांनी भरलेला होता. सरचिटणीस विनोद तिहाडा यांच्याशी असलेले त्यांचे मतदेखील लोकांसमोर आले.

वाचा-दानिश प्रकरणावर शोएब अख्तरचा यु-टर्न, नव्या VIDEOमध्ये केलं भलतंच स्पष्टीकरण

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 29, 2019 08:40 PM IST

ताज्या बातम्या