S M L

FIFA WC 2018 : बेल्जियमकडून बलाढ्य ब्राझीलचा पराभव

जर्मनी, अर्जेंटिना, स्पेन, उरूग्वे यांच्या पाठोपाठ फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील जेतेपदाच्या पाचव्या दावेदाराला घरचा रस्ता धरावा लागलाय.

Updated On: Jul 7, 2018 09:53 AM IST

FIFA WC 2018 : बेल्जियमकडून बलाढ्य ब्राझीलचा पराभव

रशिया, 07 जुलै : जर्मनी, अर्जेंटिना, स्पेन, उरूग्वे यांच्या पाठोपाठ फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतील जेतेपदाच्या पाचव्या दावेदाराला घरचा रस्ता धरावा लागलाय. ब्राझीलचा पराभव करत बेल्जियमने अनपेक्षित निकाल नोंदवताना 2-1 अशा विजयासह उपांत्य फेरीत प्रवेश केलाय. 1986मध्ये त्यांना चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं होतं. ब्राझीलने अखेरच्या मिनिटाला सोप्या संधी गमावल्यानं त्यांना विजय मिळवता आला नाही. 2002 नंतर त्यांची जेतेपदाची पाटी कोरीच राहिलीय. उपांत्य फेरीत बेल्जियमला फ्रान्सचा सामना करावा लागणाराय.

दुसऱ्या सत्रात ब्राझीलने विलियनला बाकावर बसवून फर्मिनोला पाचारण केले. विश्वचषक स्पर्धेच्या इतिहासात पहिल्या सत्रात दोन किंवा त्याहून अधिक गोलने पिछाडीवरून एकाही संघाला विजय मिळवता आलेला नाही. ब्राझीलने विजयासाठी जंगजंग पछाडले, परंतु नशीब त्यांच्यावर रुसले होते. गोलपोस्टच्या अगदी जवळ जाऊनही त्यांना गोल करता येत नव्हता. प्रत्येक वेळी त्यांच्या तोंडचा घास कुणीतरी पळवत असल्याचे जाणवत होते. त्यामुळे ब्राझिलचे खेळाडू वैतागलेले पाहायला मिळाले.

हेही वाचा

घरात जेवायला बोलावले, पत्नीने पतीच्या अंगावर उकळते तेल ओतले

दुसऱ्या टी20 क्रिकेट सामन्यात इंग्लंडकडून भारताचा 5 गडी राखून पराभव

Loading...
Loading...

FIFA WC 2018 : उपान्य फेरीत फ्रान्सचा दिमाखदार प्रवेश

76व्या मिनिटाला अखेर ब्राझिलला यशप्राप्त झाले. रेनाटो ऑगस्टोने अप्रतिम हेडर लगावत ब्राझीलचे गोल खाते उघडले. 21 प्रयत्नांनंतर ब्राझिलला मिळालेले हे पहिले यश ठरले. त्यानंतर सोप्या संधीवर गोल करण्यात आलेले अपयश ब्राझिलच्या पराभवाला कारणीभूत ठरले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 7, 2018 09:49 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close