मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

FIFA World Cup 2018 : आज स्पेन विरुद्ध पोर्तुगाल थरार रंगणार

FIFA World Cup 2018 : आज स्पेन विरुद्ध पोर्तुगाल थरार रंगणार

Soccer Football - Champions League - A.S. Roma vs Chelsea - Stadio Olimpico, Rome, Italy - October 31, 2017   AS Roma's Aleksandar Kolarov in action with Chelsea's Cesc Fabregas    REUTERS/Alessandro Bianchi

Soccer Football - Champions League - A.S. Roma vs Chelsea - Stadio Olimpico, Rome, Italy - October 31, 2017 AS Roma's Aleksandar Kolarov in action with Chelsea's Cesc Fabregas REUTERS/Alessandro Bianchi

जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांना सलामीच्याच लढतीत एकमेकांविरुद्ध खेळताना पाहण्याची संधी म्हणजे पवर्णीच.

रशिया, 15 जून : फुटबॉल विश्वचषकाचा बिगूल काल वाजला असला तरी स्पर्धेचा खरा थरार आज रंगणार आहे. आज स्पेन आणि पोर्तुगाल यांच्यात आज लढत होणार आहे. जेतेपदाच्या शर्यतीत असलेल्या या दोन कट्टर प्रतिस्पर्ध्यांना सलामीच्याच लढतीत एकमेकांविरुद्ध खेळताना पाहण्याची संधी म्हणजे पवर्णीच. ख्रिस्तियानो रोनाल्डो या एकखांबी तंबूवर पोर्तुगालची मदार आहे, तर स्पेनकडे मातब्बर खेळाडूंची अख्खी फौज आहे. त्यामुळे हा सामना बघण्यासाठी फुटबॉलप्रेमी उत्सुक आहे. हा सामना  भारतीय वेळेनुसार रात्री 11.30 वाजता सोनी टेन 2, सोनी टेन 3 वर दाखवण्यात येणार आहे. हेही वाचा

FIFA World Cup 2018 - सलामीच्या सामन्यात रशियाकडून सौदी अरेबियाचा 5-0 ने धुव्वा

दरम्यान, जगभरात सध्या FIFA वर्ल्डकपचा फिव्हर पाहायला मिळतोय. रशियातील मॉस्को शहरात गुरूवारी FIFA वर्ल्डकपचा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यानंतर यजमान रशिया आणि सौदी अरेबियातील सलामीच्या सामन्यानं यंदाच्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेला सुरूवात झाली. त्यात रशियानं बाजी मारली. यंदा 32 संघ एकमेकांसमोर आमनेसामने ठाकले असून विजेतेपदासाठी प्रत्येक संघ कडवा संघर्ष करताना पाहायला मिळेल. त्यामुळे पुढील महिनाभर जगभरातील कोट्यावधी फुटबॉल चाहत्यांना सर्वोत्तम खेळाची मेजवानी पाहायला मिळणार आहे.
First published:

Tags: Fifa, Football, Portugal, Spain, World cup, पोर्तुगाल, फिफा वर्ल्ड कप स्पर्धा, फुटबाॅल, स्पेन

पुढील बातम्या