FIFA World Cup 2018 - सलामीच्या सामन्यात रशियाकडून सौदी अरेबियाचा 5-0 ने धुव्वा

FIFA World Cup 2018 - सलामीच्या सामन्यात रशियाकडून सौदी अरेबियाचा 5-0 ने धुव्वा

रशियानं पहिल्याच सामन्यात सौदी अरेबियावर 5-0 असा दणदणीत विजय मिळवत स्पर्धेतील आपले इरादे स्पष्ट केले आहेत.

  • Share this:

रशिया, 15 जून : FIFA वर्ल्डकप 2018 स्पर्धेत यजमान रशियानं विजयी सलामी देत दमदार सुरूवात केलीय. रशियानं पहिल्याच सामन्यात सौदी अरेबियावर 5-0 असा दणदणीत विजय मिळवत स्पर्धेतील आपले इरादे स्पष्ट केले आहेत.

सामन्याच्या सुरुवातीची 10 मिनिटे सौदी अरेबियानं दमदार खेळ केला. पण सामन्याच्या 12व्या मिनिटाला युरी गॉसिन्सकीनं रशियासाठी पहिला गोल केला. सामन्याच्या 43व्या मिनिटाला डेनिस चेरीशेवनं रशियासाठी दुसरा गोल केला.

सामन्याच्या 91 व्या मिनिटालाही डेनिसनं अजून एक गोल करत संघाची आघाडी वाढवली. त्यानंतर रशियाच्या आट्रेम डीयुबा आणि गोलोव्हिन यांनी प्रत्येकी एक गोल केला आणि संघाच्या विजयात मोलाची भूमिका बजावली. आतापर्यंत फुटबॉल विश्वचषकातील यजमानांनी एकही सामना गमावलेला नाही, रशियानं ही 88 वर्षांची परंपरा कायम ठेवली आहे.

दरम्यान, जगभरात सध्या FIFA वर्ल्डकपचा फिव्हर पाहाय मिळतोय. रशियातील मॉस्को शहरात गुरूवारी FIFA वर्ल्डकपचा दिमाखदार उद्घाटन सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यानंतर यजमान रशिया आणि सौदी अरेबियातील सलामीच्या सामन्यानं यंदाच्या फिफा वर्ल्डकप स्पर्धेला सुरूवात झाली.

यंदा 32 संघ एकमेकांसमोर आमनेसामने ठाकले असून विजेतेपदासाठी प्रत्येक संघ कडवा संघर्ष करताना पाहायला मिळेल. त्यामुळे पुढील महिनाभर जगभरातील कोट्यावधी फुटबॉल चाहत्यांना सर्वोत्तम खेळाची मेजवानी पाहायला मिळणार आहे.

 

हेही वाचा...

जेव्हा विराट अनुष्काला डिनर डेटला घेऊन जातो

बुरखा घालण्याच्या जबरदस्तीमुळे सौम्या स्वामीनाथनची इराणच्या बुद्धिबळ स्पर्धेतून माघार !

First published: June 15, 2018, 9:27 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading