FIFA World Cup 2018- मेक्सिकोकडून जगज्जेत्या जर्मनीचा पराभव,1-0 ने विजयी

FIFA World Cup 2018- मेक्सिकोकडून जगज्जेत्या जर्मनीचा पराभव,1-0 ने विजयी

फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गतविजेत्या जर्मनीला मेक्सिकोने ‘फ’ गटाच्या पहिल्याच सामन्यात १ -० ने पराभूत करून खळबळ उडवून दिली.

  • Share this:

मॉस्को, 18 जून : फिफा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत गतविजेत्या जर्मनीला मेक्सिकोने ‘फ’ गटाच्या पहिल्याच सामन्यात १ -० ने पराभूत करून खळबळ उडवून दिली. हिरविंग लुझानो याने ३५व्या मिनिटाला केलेल्या गोलच्या जोरावर मेक्सिकोने बलाढ्य जर्मनीवर हा विजय मिळवला. गेल्या विश्वचषकातही गतविजेत्यांना पहिल्याच सामन्यात पराभव पत्करावा लागला होता.

या सामन्यात जर्मनीने एकुण २५ वेळा मेक्सिकोच्या गोलपोस्टवर आक्रमण केले मात्र दिशाहीन शॉट आणि मेक्सिकोच्या गुईलिमिरो ओईचा याच्या अप्रतिम गोलरक्षणामुळे जर्मनीच्या बलाढ्य संघाला गोल नोंदवता आला नाही.

अतिरिक्त वेळेत गोलरक्षक नेअर सहीत जर्मनीचे सर्वच्या सर्व अकरा खेळाडू मेक्सिकोवर आक्रमण करत होते. मात्र मेक्सिकोच्या बचाव फळीने आपली अभेद्यता कायम राखली.

दरम्यान मेक्सिकोच्या मारक्वेझने आजच्या सामन्यात अनोख्या विक्रमाची नोंद केली. मारक्वेझचा हा पाचवा विश्वचषक ठरला आहे. यासह मारक्वेझने मेक्सिकोच्या अॅन्टोनियो कारवाएल आणि जर्मनीच्या लोथर मथाएसच्या विक्रमाशी बरोबरी केली.

First published: June 18, 2018, 12:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading