News18 Lokmat

गोवेकरांचं आणि क्रोशियाचं हे कनेक्शन तुम्हाला माहित आहे का?

आजही गोव्यात अनेकजण पोर्तुगाल फुटबॉल टीमला समर्थन देताना दिसतात

News18 Lokmat | Updated On: Jul 15, 2018 03:02 PM IST

गोवेकरांचं आणि क्रोशियाचं हे कनेक्शन तुम्हाला माहित आहे का?

पणजी, 15 जुलैः सध्या अख्या जगाला कोणत्या एका खेळाने वेड लावलं असेल तर ते म्हणजे फुटबॉल. आज फुटबॉल वर्ल्ड कपचा अंतिम सामना क्रोएशिया आणि फ्रान्समध्ये रंगणार आहे. जग्गजेते संघ असूनही क्रोएशिया आमि फ्रान्सने केलेली कामगिरी अनेकांना थक्क करुन जाते. भारतातही फुटबॉलवेडे काही कमी नाहीत. फुटबॉल या खेळाच्या प्रेमात गोवेकर अग्रणी आहेत.

काहींच्या मते आज फ्रान्स जिंकेल तर काहींना क्रोएशिया जिंकेल असेच वाटते. पण अख्खं गोवा मात्र क्रोएशिया जिंकावी म्हणून देवाला साकडं घालत आहे. वाचून जरा आश्चर्य वाटेल पण हेच खरं आहे. आता तुम्ही विचाराल की, क्रोएशियासाठी गोव्यातली लोकं एवढी का वेडी आहेत. याला कारणही तसंच आहे...

गोव्यावर पोर्तुगीजांचे राज्य होते. तेव्हा पोर्तुगीजांनी जहाजं बनवून घेण्यासाठी खास क्रोएशियातून माणसं गोव्यात आणली होती. जवळपास 12 हजार क्रोएशियन लोक गोव्यात गवंडळी गावात वास्तवाला होते. जहाज बनवण्याच्या काळात त्यांनी गोव्यात साव ब्राझ हे चर्चही उभारले.

पोर्तुगीज हे फुटबॉलप्रेमी आहेत. गोव्यात त्यांचे राज्य असल्यामुळे आपसूक गोवेकरांमध्येही हे फुटबॉल प्रेम आले. आजही गोव्यात अनेकजण पोर्तुगाल फुटबॉल टीमला समर्थन देताना दिसतात तर काही ब्राझीलचे कट्टर समर्थक आहेत. पण या वर्ल्डकपमध्ये मात्र सारेच आता क्रोएशियाला समर्थन देताना दिसत आहेत. क्रोएशिया संघ फिफा वर्ल्डकप जिंकावा म्हणून रविवारी चर्चमध्ये प्रार्थनाही करण्यात आली.

हेही वाचाः

Loading...

माझ्या वडिलांचं देशासाठीच योगदान न विसरणारं,'सेक्रेड गेम्स' वादावर राहुल गांधींचं टि्वट

बस्स एकच नाव इंडिया!, राष्ट्रगीत सुरू असताना सुवर्णकन्या हिमाला अश्रू अनावर

मॉडेल म्हणाली – तर त्याने मला संपवून टाकले असते

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 15, 2018 02:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...