मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Football: फिफाच्या निर्णयामुळे भारतीय फुटबॉलचं भविष्य अंधारात, महिला U-17 विश्वचषकाचं यजमानपदही जाणार?

Football: फिफाच्या निर्णयामुळे भारतीय फुटबॉलचं भविष्य अंधारात, महिला U-17 विश्वचषकाचं यजमानपदही जाणार?

फिफाकडून भारतीय फुटबॉल महासंघाचं निलंबन

फिफाकडून भारतीय फुटबॉल महासंघाचं निलंबन

Football: फिफाच्या नियमांनुसार सदस्य संघटना त्यांच्या देशात कायदेशीर आणि राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त असणं आवश्यक आहे. फिफाने यापूर्वीही अशा प्रकरणांमध्ये काही देशांना निलंबित केलेलं आहे.

  • Published by:  Siddhesh Kanase
मुंबई, 16 ऑगस्ट: जागतिक फुटबॉल संघटना अर्थात फिफानं भारतीय फुटबॉल महासंघावर मोठी कारवाई केली आहे. त्यामुळे भारतीय फुटबॉल विश्वात एकच खळबळ उडाली. फिफानं थेट भारतीय फुटबॉल संघाचं तात्काळ निलंबन केलं आहे. फिफाच्या नियमांचं उल्लंघन केल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे गेल्या 85 वर्षांच्या इतिहासात भारतीय फुटबॉल महासंघाला निलंबनाच्या कारवाईला सामोरं जावं लागत आहे. फुटबॉल महासंघातील त्रयस्थ पक्षांच्या अवाजवी प्रभावामुळे फिफानं हे कठोर पाऊल उचललं आहे. ऑगस्टच्या सुरुवातील फिफानं AIFF नं याबाबत इशाराही दिला होता. यावेळी फिफानं ऑक्टोबरमध्ये भारतात आयोजित अंडर-17 महिला विश्वचषकाचं यजमानपद काढून घेण्याची धमकीही दिली होती. फिफाच्या नियमांनुसार सदस्य संघटना त्यांच्या देशात कायदेशीर आणि राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त असणं आवश्यक आहे. फिफाने यापूर्वीही अशा प्रकरणांमध्ये काही देशांना निलंबित केलेलं आहे. निलंबन कधी मागे घेतलं जाणार? निलंबन मागे घेण्यासंदर्भात फिफानं एका निवेदनात म्हटलंय की, ‘ एआयएफएफ कार्यकारी समिती आणि एआयएफएफ प्रशासनाच्या दैनंदिन कामकाजावर संपूर्ण नियंत्रण मिळविण्यासाठी प्रशासकांची समिती स्थापन करण्याच्या आदेशानंतरच निलंबन मागे घेण्यात येईल.’ हेही वाचा - Ind vs Zim: झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेआधी भारताला धक्का, ‘हा’ ऑलराऊंडर खेळाडू दुखापतीमुळे ‘आऊट’ विश्वचषकाच्या आयोजनाबाबत अनिश्चितता येत्या 11 ते 30 ऑक्टोबरदरम्यान भारतात फिफा अंडर-17 महिला विश्वचषकाचं आयोजन करण्यात आलं आहे. देशातल्या भुवनेश्वर, गोवा आणि मुंबई या शहरांमध्ये विश्वचषकाचे सामने होणार होते. पण फिफाच्या निर्णयामुळे आता या स्पर्धेच्या आयोजनाबाबत अनिश्चितता दिसून येतेय. फिफानं हेही स्पष्ट केलंय की स्पर्धेचं आयोजन निर्धारित वेळेत होणं आता शक्य नाही. इतकच नव्हे तर निलंबन मागे घेतल्याशिवाय भारतीय फुटबॉल संघाला कोणत्याही स्पर्धेत सहभागी होता येणार नाही. कारवाईच्या मुळाशी प्रफुल पटेल? दरम्यान फिफानं भारतीय फुटबॉल महासंघावर केलेल्या या कारवाईसाठी AIFF चे माजी अध्यक्ष प्रफुल पटेल यांना जबाबदार धरलं जात आहे. 2009 साली पटेल महासंघाचे अध्यक्ष बनले होते. 2022 मध्ये सर्वोच्च न्यायालयानं त्यांना पदावरुन हटवलं होतं. त्यांच्यावर अधिकारांचा गैरवापर केल्याचा ठपकाही ठेवण्यात आला होता. या सगळ्या घडामोडींनंतर AIFF वर निलंबनाची कारवाई झाली. त्यामुळे पटेलांमुळेच ही कारवाई झाल्याचं बोललं जात आहे.
First published:

Tags: Football, Sports

पुढील बातम्या