मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

FIFA Ban in India : भारतीय फुटबॉलचं भवितव्य काय, कशी हटणार संघटनेवरील बंदी?

FIFA Ban in India : भारतीय फुटबॉलचं भवितव्य काय, कशी हटणार संघटनेवरील बंदी?

ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनला (AIFF) थर्ड पार्टीच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे फिफाने मंगळवारी (16 ऑगस्ट 22) निलंबित केलं. फिफाचा हा निर्णय भारतीय फुटबॉल चाहत्यांना धक्का देणारा होता.

ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनला (AIFF) थर्ड पार्टीच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे फिफाने मंगळवारी (16 ऑगस्ट 22) निलंबित केलं. फिफाचा हा निर्णय भारतीय फुटबॉल चाहत्यांना धक्का देणारा होता.

ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनला (AIFF) थर्ड पार्टीच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे फिफाने मंगळवारी (16 ऑगस्ट 22) निलंबित केलं. फिफाचा हा निर्णय भारतीय फुटबॉल चाहत्यांना धक्का देणारा होता.

मुंबई, 17 ऑगस्ट :   ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशनला (AIFF) थर्ड पार्टीच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे फिफाने मंगळवारी (16 ऑगस्ट 22) निलंबित केलं. फिफाचा हा निर्णय भारतीय फुटबॉल चाहत्यांना धक्का देणारा होता. या निलंबनामुळे भारतीय फुटबॉल टीमवर परिणाम होईलच; पण भारत या पुढे 11 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या वूमेन्स अंडर 17 फुटबॉल वर्ल्ड कपचं आयोजन करू शकणार नाही. सर्वोच्च न्यायालयाने मे मध्ये AIFF विसर्जित केले होते आणि खेळाचे व्यवस्थापन करण्यासाठी तीन सदस्यीय समिती नियुक्त केली होती. AIFF चं निलंबन कसं हटू शकतं? FIFA च्या सदस्य संघटना कायदेशीर आणि राजकीय हस्तक्षेपापासून मुक्त असणं आवश्यक आहे. म्हणजे कोणत्याही सदस्य संघाच्या व्यवस्थापनात कोणत्याही प्रकारचा राजकीय किंवा कायदेशीर हस्तक्षेप नसायला हवा. FIFA कौन्सिलच्या ब्युरोने निर्णय घेतला आहे की निलंबनापासून मुक्त होण्यासाठी, AIFF ने COA चे आदेश मानणं बंद करायला हवं. FIFA च्या अटींचं पालन केलं पाहिजे. याचा अर्थ असा की कोणतीही फुटबॉल संघटना कोणत्याही थर्ड पार्टीने चालवू नये, असं फिफाला अपेक्षित आहे. फिफाने एका प्रसिद्धीपत्रकात म्हटलं आहे की, ‘फिफा काउन्सिलने ऑल इंडिया फुटबॉल असोसिएशनला तत्काळ निलंबित करण्याचा निर्णय घेतला आहे. कारण त्यावर थर्ड पार्टीचा प्रभाव आहे आणि हे फिफाच्या नियमांचं उल्लंघन आहे. जेव्हा प्रशासन योग्य हातात असेल आणि बोर्डच्या घटनेची योग्य अंमलबजावणी होईल, तेव्हाच हे निलंबन मागे घेतले जाईल.’ AIFF अध्यक्षपदासाठी अर्ज भरण्याची बुधवारी (17 ऑगस्ट 22) शेवटची तारीख आहे. तसंच या प्रकरणावर बुधवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. सर्वात मोठा गुन्हेगार कोण? गेल्या दोन वर्षांपासून भारतीय फुटबॉलमध्ये सुरू असलेल्या वादाचं सर्वांत मोठं कारण म्हणजे प्रफुल्ल पटेल (Prafulla Patel). 2009 मध्ये, प्रफुल्ल पटेल पहिल्यांदा भारतीय फुटबॉल महासंघाचे अध्यक्ष बनले. ते या पदावर कायम राहिले आणि त्यांचा कार्यकाळ 2020 मध्ये संपला. कार्यकाळ संपल्यानंतर निवडणुकीद्वारे नवा अध्यक्ष निवडला जातो, पण पटेलांनी पदाचा राजीनामा दिला नाही. खेळ आचार संहितेनुसार कोणत्याही राष्ट्रीय खेळ संघात एखादी व्यक्ती जास्तीत जास्त 12 वर्ष आपल्या पदावर राहू शकते. प्रफुल पटेल यांचा हा कार्यकाळ पूर्ण झाला होता. यानंतर प्रकरण सुप्रीम कोर्टात गेलं आणि हस्तक्षेप करण्याची मागणी झाली. आता फिफाने या प्रकरणात तिसऱ्या पक्षाचा हस्तक्षेप झाल्याचं सांगत एआयएफएफचं निलंबन केलं. FIFA ची भारतावर बंदी, प्रफुल पटेलांचा हट्ट पडला महागात! समजून घ्या क्रोनोलॉजी  माजी कॅप्टनचं मत काय? भारतीय फुटबॉल संघाचा माजी कॅप्टन बाईचुंग भुतिया म्हणाला, "फिफाने भारतीय फुटबॉलवर बंदी घातली हे खूप दुर्दैवी आहे. मला वाटतं की हा एक अतिशय कठोर निर्णय आहे. पण त्याचवेळी ही आपल्यासाठी एक मोठी संधी आहे की, आपण आपली व्यवस्था सुधारू शकतो. स्टेकहोल्डर्स, क्रीडा मंत्रालय आणि असोसिएशन यांनी एकत्र येऊन  दुरुस्त करून घ्यायला हवी. तसंच भारतीय फुटबॉलच्या भल्यासाठी सर्वांनी मिळून काम करायला हवं.” रोनाल्डोच्या मॅन्चेस्टर युनायटेडवर एलन मस्कची नजर? पाहा मस्कच्या ‘त्या’ ट्विटची का होतेय चर्चा? खेळावर लक्ष केंद्रीत करा रविवारी भारतीय फुटबॉल संघाचा कॅप्टन सुनील छेत्री याने खेळाडूंशी संवाद साधताना त्यांना फिफाच्या धमक्यांकडे लक्ष न देण्यास आणि खेळावर लक्ष केंद्रीत करण्यास सांगितलं. तसंच ही बाब आपल्या नियंत्रणाबाहेर असून, संबंधित अधिकारी हे संपूर्ण प्रकरण चांगल्याप्रकारे सोडवण्याचा प्रयत्न करत आहेत, असंही सुनीलने स्पष्ट केलं होतं.
First published:

Tags: Football, Sports

पुढील बातम्या