FIFA World Cup 2018 : मेसीच्या खेळीनं टळली अर्जेंटिनावरची पराभवाची नामुष्की

नायजेरियाला 2-1 अशी मात देत अर्जेंटिनं अंतिम 16मध्ये आपली जागा तयार केली आणि अर्जेंटिनाच्या चाहत्यांनी निश्वास सोडला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jun 27, 2018 10:50 AM IST

FIFA World Cup 2018 : मेसीच्या खेळीनं टळली अर्जेंटिनावरची पराभवाची नामुष्की

रशिया, 27 जून : काल रंगतदार ठरलेल्या सामन्यात अर्जेंटिनानं नायजेरियावर बाजी मारली. लिओनेल मेस्सीनं फर्स्ट हाफमध्ये गोल केला, तर नायजेरियाने 51व्या मिनिटाला गोल करत सामन्यात 1-1 अशी बरोबरी साधली होती. पण सामन्याच्या 85व्या मिनिटाला माक्रोस रोजोने निर्णायक गोल मारला आणि अर्जेंटिना अखेर बाद फेरीत पोहोचला. नायजेरियाला 2-1 अशी मात देत अर्जेंटिनं अंतिम 16मध्ये आपली जागा तयार केली आणि अर्जेंटिनाच्या चाहत्यांनी निश्वास सोडला.

हेही वाचा

संतापजनक ! तंबाखू दिला नाही म्हणून नातवाने आजोबावर कुऱ्हाडीने केले वार

'आपले मुख्यमंत्री म्हणजे भोळे सांब, निष्ठावान सेवक', सामानातून मुख्यमंत्र्यांबाबत व्यक्त केली चिंता

उदयनराजे आणि रामराजे यांच्यात पुन्हा वाकयुद्ध, विश्रामगृहात आमने-सामने

Loading...

अर्जेंटिना-नायजेरिया सामना सुरु झाल्यानंतर अर्जेंटिनाच्या तमाम चाहत्यांच्या मनावर प्रचंड तणाव होता. अगदी अर्जेंटिनाचा दिग्गज फुटबॉलपटू दिएगो मॅराडोनाही यातून सुटला नाही. मॅराडोनालाही काही वेळासाठी या सामन्याचा तणाव पेलवला नाही. सामना संपल्यावर त्याच्यावर उपचार करावे लागले.

१९८६ साली अर्जेंटिनाच्या वर्ल्डकप विजयात मॅराडोनाने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्यानंतर चार वर्षांनी त्याने अर्जेंटिनाला पुन्हा एकदा अंतिम फेरीत पोहोचवले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 27, 2018 10:43 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...