Home /News /sport /

भारताचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणाऱ्या 21 वर्षीय महिला शूटिंग खेळाडूची आत्महत्या

भारताचं नाव आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणाऱ्या 21 वर्षीय महिला शूटिंग खेळाडूची आत्महत्या

या 21 वर्षीय तरुणीने स्वत:चीच गन डोक्यावर ठेवून गोळी झाडली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.

    चंदीगड, 9 डिसेंबर : फरीदकोटमधील हरिंदा भागात बुधवारी रात्री आंतरराष्ट्रीय शूटिंग महिला खेळाडूने (International shooting female player) आपल्याच शूटिंग गनने स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या (suicide case) केल्याचं समोर आलं आहे. मृत तरुणी 19 वर्षांची असून तिचं नाव खुशकिरत कौर असं आहे. ती नुकत्याच आयोजित केलेल्या पतियाळा येथील नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिपमध्ये सहभागी झाली होती. यावेळी एकही मेडल न मिळाल्यामुळे ती मानसिक दृष्ट्या तणावात होती. सांगितलं जात आहे की, बुधवारी रात्री ती आपल्या घरात आजीसोबत झोपली होती. आपली नात असं काही करेल याबाबत आजीला कल्पनादेखील नव्हती. गुरुवारी सकाळी कुटुंबाने पाहिलं तर त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. खुशकिरतने शूटिंग गन आपल्या डोक्यावर ठेवून गोळी चालवली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेतला आणि पोस्टमार्टमसाठी पाठवला. हे ही वाचा-B.comच्या प्रथम वर्षाच्या विद्यार्थिनीची आत्महत्या; यामुळे नेहाने जगणंच नाकारलं! कुटुंबाशी जोडलेले हॉकी कोच हरबंस सिंग यांनी सांगितलं की, खुशकिरत कौर हिने गेल्या वर्षी झालेल्या नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये एकूण 11 मेडल जिंकले होते. यानंतर विश्व कपसाठी तिची निवड झाली होती. मात्र यात ती एकही मेडल जिंकू शकली नाही. गेल्या आठवड्यात पतियाळा येथे आयोजित नॅशनल चॅम्पियनशीपमध्येही ती एकही मेडल जिंकू शकली नाही. यामुळे ती खूप नाराज झाली होती आणि तणावात होती. यातूनच तिने भयंकर पाऊल उचलल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Suicide

    पुढील बातम्या