S M L

रॉजर फेडररनं आठव्यांदा जिंकलं विम्बल्डनचं जेतेपद

त्यानं क्रोएशियाच्या मरिन चिलीचचा पराभव केला. फेडररनं मरिन चिलीचवर 6-3, 6-1, 6-4 अशी मात केली.

Sonali Deshpande | Updated On: Jul 16, 2017 09:08 PM IST

रॉजर फेडररनं आठव्यांदा जिंकलं विम्बल्डनचं जेतेपद

16 जुलै : राॅजर फेडररनं आठव्यांदा विम्बल्डन ट्राॅफीवर आपलं नाव कोरलं. त्यानं क्रोएशियाच्या मरिन चिलीचचा पराभव केला.  फेडररनं  मरिन चिलीचवर 6-3, 6-1, 6-4 अशी मात केली.

पूर्ण टुर्नामेंटमध्ये फेडरर चांगल्या फाॅर्ममध्ये होता . त्यानं एकही सेट हरला नव्हता.

वयाच्या 35व्या वर्षीही फेडररनं आठव्यांदा विम्बल्डन जिंकून इतिहास  घडवला . त्याचं हे 19वं ग्रँड स्लॅम आहे. यावर्षी फेडरर दोन ग्रँडस्लॅम खेळला.हिरवळीवरचा राजा असा लौकिक असलेल्या फेडररने आज झालेल्या विम्बल्डन पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत पूर्ण वर्चस्वानिशी खेळ केला. स्वीत्झर्लंडच्या या महान खेळाडूच्या आव्हानाचा सामना करणे प्रतिस्पर्धी मारिन सिलिचला शक्य झाले नाही. पहिला गेम जिंकत सिलिचने चांगली सुरुवात केली. पण त्यानंतर फेडररच्या आव्हानासमोर त्याची डाळ शिजली नाही.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Jul 16, 2017 08:37 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close