French Open : फेडररला जे जमलं नाही ‘तो’ महापराक्रम करण्याची संधी 'या' खेळाडूला

French Open : फेडररला जे जमलं नाही ‘तो’ महापराक्रम करण्याची संधी 'या' खेळाडूला

फेडररने त्याच्या कारकीर्दीत आजपर्यंतच्या सर्वाधिक 20 तर क्ले किंग नदालनं 17 ग्रँडस्लॅममध्ये बाजी मारली आहे.

  • Share this:

पॅरिस, 26 मे : क्रिकेटमध्ये जसे विश्वचषकाला महत्त्व असते, तसेच टेनिसमध्ये फ्रेंच ओपनला असते. त्यामुळं सध्या जगभरातील टेनिस प्रेमींना यंदाचा ग्रॅंडस्लॅम कोण मारणार याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, नोव्हाक जोकोव्हिच यंदाच्या फ्रेंच ओपनमध्ये सलग चार ग्रँडस्लॅम जिंकून दाखवण्याची कामगिरी करण्यास सज्ज आहे. मात्र त्याच्यासमोर राफेल नदाल आणि रॉजर फेडरर यांचेच प्रमुख आव्हान असणार आहे. तर महिलांमध्ये नाओमी ओसाकाकडून जास्त अपेक्षा आहेत.

नोव्हाक जोकोव्हिचनं तीन वर्षांपूर्वी सलग ग्रॅंडस्लॅम जिंकण्याची किमया केली होती. अशा प्रकारची कामगिरी याआधी डॉन बज आणि रॉड लेव्हर यांनाच जमली होती. जोकोव्हिचने 2018ची विम्बल्डन आणि अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा तसेच यंदा जानेवारीत झालेली ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा जिंकली होती. त्यामुळं आता फ्रेंच ओपन मारत तो एका विक्रमाला गवसणी घालण्यास सज्ज आहे.

दरम्यान, यंदाच्या फ्रेंच टेनिस स्पर्धेत जोकोव्हिचची पहिली लढत पोलंडच्या हुबर्ट हूरकॅझशी होणार आहे.

तर, दुसरीकडे टेनिसचा बादशाह फेडररने त्याच्या कारकीर्दीत आजपर्यंतच्या सर्वाधिक 20 तर क्ले किंग नदालनं 17 ग्रँडस्लॅममध्ये बाजी मारली आहे. मात्र त्या दोघांनाही सलग चारही ग्रँडस्लॅममध्ये विजयी कामगिरी करता आलेली नाही. या ऐतिहासिक कामगिरीसाठी जोकोव्हिच सज्ज असला तरी, त्याला लयीत परतलेल्या फेडररचे आव्हान असणार आहे.

सेरेना फिट की अनफिट ?

एकीकडे नोव्हाक जोकोव्हिच तर, दुसरीकडे महिला टेनिसमध्ये वर्चस्व प्रस्थापित करणारी सेरेना विल्यम्स ही विश्वविक्रमी २४ ग्रँडस्लॅमशी बरोबरी करण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, तिच्या तंदुरुस्तीबाबत प्रश्नचिन्ह कायम असल्याने यंदा ती संभाव्य दावेदारांच्या शर्यतीत नाही. सेरेनाची पहिली लढत रशियाच्या व्हिटालिया डियाचेन्कोशी होणार आहे.

वाचा-World Cup : भारताच्या 'मिशन' वर्ल्डकपला धक्का, पहिल्याच सामन्यात विराटसेनेचे वस्त्रहरण !

वाचा-World Cup : सामना गमावल्यानंतर विराटसाठी खुशखबर, अखेर चौथ्या क्रमांकाचा तिढा सुटणार

वाचा-फक्त खेळाडूच नाही तर 'या' पाच हॉट अ‍ॅंकरही गाजवणार ICC Cricket World Cup

वाचा-अर्जुन तेंडुलकरवर बरसला 'हा' मुंबईकर खेळाडू, 57 चेंडूतच ठोकले शतक

VIDEO: 'हॉट' मराठवाड्यामुळे नागरिकांचे हाल, इतर महत्त्वाच्या 18 घडामोडी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 26, 2019 12:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading