• Home
 • »
 • News
 • »
 • sport
 • »
 • वाढदिवसाच्या दिवशी युवराजसिंहची नाराजी उघड, वडिलांच्या 'त्या' वक्तव्याशी संबंध नसल्याचं स्पष्टीकरण

वाढदिवसाच्या दिवशी युवराजसिंहची नाराजी उघड, वडिलांच्या 'त्या' वक्तव्याशी संबंध नसल्याचं स्पष्टीकरण

युवराज सिंहचे (Yuvraj Singh) वडील योगराज सिंह (Yograj Singh) यांनी काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावर आपण नाराज असल्याचं युवराज सिंहनं स्पष्ट केलंय. त्याबाबतची एक पोस्ट त्यानं इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केलीय

 • Share this:
  मुंबई,12 डिसेंबर : टीम इंडियाला दोन वर्ल्ड कप विजेतेपदासह अनेक संस्मरणीय विजय मिळवून देणारा क्रिकेटपटू युवराज सिंहचा (Yuvraj Singh) आज वाढदिवस आहे. या वाढदिवसाचा आनंद साजरा करण्याच्या युवराजच्या मुडमध्ये मिठाचा खडा पडला आहे. युवराज सिंहचे वडील योगराज सिंह (Yograj Singh) यांनी काही दिवसांपूर्वी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. त्या वक्तव्यावर आपण नाराज असल्याचं युवराज सिंहनं स्पष्ट केलंय. त्याबाबतची एक पोस्ट त्यानं इन्स्टाग्रामवर (Instagram) शेअर केली आहे. ‘वडिलांच्या विधानाबद्दल आपण दु:खी असून माझी विचारधारा ही वडिलांपेक्षा वेगळी आहे,’ असं युवराजनं या पोस्टमध्ये स्पष्ट केलं आहे . त्याचबरोबर गेल्या दोन आठवड्यांपासून सुरु असलेलं शेतकरी आंदोलन (Farmers Protest) लवकरच संपेल आणि या विषयावर योग्य तोडगा निघेल अशी आशा देखील युवराजनं व्यक्त केली आहे.
  हे वाचा-IND vs AUS : ऑस्ट्रेलियाला हरवण्यासाठी द्रविड-कुंबळेने सांगितली रणनीती काय म्हणाले होते योगराज? शेतकरी आंदोलनाचं समर्थन करताना योगराज सिंह यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. शेतकरी आंदोलनातील त्यांच्या भाषणाचा  एक व्हिडिओ सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. त्यामध्ये ते पंजाबी भाषेत भाषण करत आहेत. भाषणादरम्यान योगराज सिंग यांनी हिंदूंना गद्दार म्हणल्याचं या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. 'हे हिंदू गद्दार आहेत, 100 वर्ष त्यांनी मुगलांची गुलामी केली,' असं योगराज सिंग भाषणादरम्यान म्हणाल्याचं या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलं आहे. एवढच नाही तर त्यांनी महिलांबाबतही वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. हे वाचा-बॉलिंगसाठी नाही तर या कारणासाठी बुमराहला ड्रेसिंग रूममध्ये मिळाला 'गार्ड ऑफ ऑनर' सोशल मीडियावर अनेकांनी योगराज सिंग यांच्या या वक्तव्याची टीका केली आहे. योगराज सिंग यांचं वक्तव्य चिथावणीखोर, अपमानकारक आणि घृणास्पद असल्याचं अनेकांनी म्हणलं आहे. याआधीही योगराज सिंग त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे चर्चेत होते. भारताचा माजी कर्णधार एमएस धोनीच्या बाबतीतही त्यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. युवराजला भारतीय टीममधून बाहेर काढण्यात आलं, त्यानंतर त्याला टीममध्ये जागा मिळत नव्हती, म्हणून योगराज सिंग यांनी धोनीला जबाबदार धरलं होतं.
  Published by:News18 Desk
  First published: