मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Farmers Protest : रोहित शर्माबाबतचं ट्विट पडलं महागात, दोन तासात कंगनावर दोन मोठ्या कारवाई

Farmers Protest : रोहित शर्माबाबतचं ट्विट पडलं महागात, दोन तासात कंगनावर दोन मोठ्या कारवाई

 शेतकरी आंदोलनाबाबत बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) केलेली दोन ट्विट तिला चांगलीच महागात पडली आहेत. ट्विटरने (Twitter) कंगनाची दोन्ही ट्विट डिलीट केली आहेत.  यातलं एक ट्विट तिने रोहित शर्मा (Rohit Sharma)च्या ट्विटला प्रतिक्रिया देताना केलं होतं.

पुढे वाचा ...
  • Published by:  Shreyas

मुंबई, 4 फेब्रुवारी : शेतकरी आंदोलनाबाबत बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौतने (Kangana Ranaut) केलेली दोन ट्विट तिला चांगलीच महागात पडली आहेत. ट्विटरने (Twitter) कंगनाची दोन्ही ट्विट डिलीट केली आहेत. कंगनाची दोन्ही ट्विट द्वेष पसरवणारी असल्यामुळे ती डिलीट करण्यात आली असल्याचं स्पष्टीकरण ट्विटरने दिलं आहे. यातलं एक ट्विट तिने रोहित शर्मा (Rohit Sharma)च्या ट्विटला प्रतिक्रिया देताना केलं होतं. अमेरिकन पॉप स्टार रिहानाने शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिल्यानंतर अनेक आंतरराष्ट्रीय सेलिब्रिटींनीही आंदोलनाचं समर्थन केलं. यानंतर केंद्र सरकारनेही प्रतिक्रिया दिली. सरकारच्या या प्रतिक्रियेला बॉलीवूड आणि क्रिकेटपटूंचंही समर्थन मिळालं आहे. सचिन तेंडुलकरपासून ते विराट कोहलीपर्यंत अनेक क्रिकेटपटूंनी त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून याबाबतचं ट्विट केलं आहे. यात टीम इंडियाचा ओपनर रोहित शर्मा याचाही समावेश आहे. पण रोहित शर्माच्या या ट्विटवर अभिनेत्री कंगना रणौत चांगलीच भडकली.

पॉप गायक रिहाना आणि पर्यावरण कार्यकर्ता ग्रेट थनबर्ग यांच्यासारख्या सेलिब्रिटींनी शेतकरी आंदोलनाचं समर्थन केलं. यानंतर बॉलीवूड, क्रिकेटपटू आणि केंद्रीय मंत्र्यांनी सरकारचं समर्थन केलं. सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे, रवी शास्त्री यांनी इंडिया टुगेदर आणि इंडिया अगेन्स्ट प्रोपगेंडा हॅशटॅग वापरून ट्विट केलं.

रोहित शर्माच्या ट्विटवर उत्तर देताना कंगनाने सगळ्या क्रिकेटपटूंची तुलना धोब्याच्या कुत्र्याशी केली आहे. सगळे क्रिकेटपटू धोबी का कुत्ता , ना घर का ना घाट का, असे का वाटत आहेत? असा प्रश्न कंगनाने विचारला आहे. शेतकरी अशा कायद्याच्या विरोधात का आहेत? जे त्यांच्या भल्यासाठी आहेत. हे दहशतवादी आहेत, जे गोंधळ घालत आहेत. म्हणा ना, इतके काय घाबरता? असं ट्विट कंगनाने केलं.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानेही याबाबत भूमिका घेतली आहे. काही स्वार्थी समूह आपला अजेंडा थोपवण्याचा प्रयत्न करत आहेत. सेलिब्रिटींकडून सोशल मीडियावर हॅशटॅग आणि वादग्रस्त वक्तव्य करणं चुकीचं आणि बेजबाबदार आहे, असं परराष्ट्र मंत्रालयाचं म्हणणं आहे. तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनीही याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. कोणताही अपप्रचार भारताची एकता मिटवू शकत नाही. देशाला नव्या उंचीवर नेण्यासाठी कोणीही रोखू शकत नाही, असं अमित शाह म्हणाले.

First published: