राजकारण्यांनी वाऱ्यावर सोडलेल्या शेतकऱ्यांसाठी मराठमोळ्या क्रिकेटपटूनं घेतला पुढाकार!

महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. त्यांच्या मदतीसाठी आता मराठमोळा क्रिकेटपटू आला आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 5, 2019 01:03 PM IST

राजकारण्यांनी वाऱ्यावर सोडलेल्या शेतकऱ्यांसाठी मराठमोळ्या क्रिकेटपटूनं घेतला पुढाकार!

पुणे, 05 नोव्हेंबर : महाराष्ट्रात सध्या अवकाळी पावसामुळं शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. एकीकडे हतबल झालेला शेतकरी मदतीच्या आशेवर असताना दुसरीकडे राजकारण्यांचा सत्ता स्थापनेवर डोळा आहे. महाराष्ट्रातील काही भागात शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. अशा सगळ्या परिस्थितीत सामाजिक बांधिलकी जोपासत भारताचा मराठमोळा क्रिकेटपटू शेतकऱ्यांच्या मदतीसाठी धावून आला आहे.

अवकाळी पावसामुळं पीकांचे नुकसान होत असताना हतबल शेतकऱ्यांसाठी मराठमोळ्या अजिंक्य रहाणेनं मदतीचा हात पुढे केला आहे. पुण्याच शिवार संवाद या कार्यक्रमात अजिंक्य रहाणेनं शेतकऱ्यांच्य सध्याच्या परिस्थितीवर भाष्य करत त्यांना मदत करा, असे आवाहनही केले. या कार्यक्रमात अजिंक्य रहणेनं, “शेतकऱ्यांच्या कष्टामुळं आपल्याला दोन वेळचं अन्न मिळतं. त्यामुळं त्यांना आपण नेहमी मदत केली पाहिजे. मला जेव्हा कधी संधी मिळते. मी त्यांच्या मदतीसाठी काय तत्पर असतो. सध्या अवकाळी पावसामुळं महाराष्ट्रातील परिस्थिती भीषण आहे”, असे मत व्यक्त केले.

वाचा-'महा'वादळ या दिवशी धडकणार ? या किनारपट्टीला धोका, पुढचे 3 दिवस पावसाचे

एकीकडे सोशल मीडियावर फक्त शेतकऱ्यांबद्दल मत व्यक्त करणारे खुप असतात. मात्र बाहेर पडून शेतकऱ्यांन खरी मदत करणारे कमी असतात. याआधी अजिंक्य रहाणेनं सांगली आणि कोल्हापूर येथे आलेल्या पुरस्थितीत लोकांना मदत केली होती. त्यावेळी ही रहाणे पूरग्रस्तांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिला होता. आताही शेतकऱ्यांच्या मदतीसाठी तो धावून आला आहे.

वाचा-राज्यातला सत्तेचा पेच सोडविण्यासाठी पंतप्रधान मोदी घेणार पुढाकार

‘क्रिकेटमध्ये जसा टॉस अनिश्चित तसा पाऊस’

शेतकऱ्यांच्या सध्याच्या परिस्थितीबाबत बोलताना रहाणेनं, “क्रिकेटमध्ये टॉस कोण जिंकणार हे आपल्या हातात नसते. टॉस जिंकलो तर फायदा होतोच आणि हरलो तर मार्ग काढावा लागतो. शेतकऱ्यांची परिस्थीतीही तशीच आहे. आता अवकाळी पावसामुळं त्यांच्यावर संकंट आहे. पण आपल्याला मार्ग काढालया हवा”, असे सांगितले. तसेच, “लहानपणापासून मला शेतकऱ्यांसाठी काही तर करायचे होते, आता संधी मिळाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांसाठी जमेल ते मी करेन”, असेही तो म्हणाला.

वाचा-गांगुलीचा आणखी एक धमाका, IPLमध्ये येणार टशन वाढवणारा नवा नियम!

‘शेतकऱ्यांना मदत करायला कधीच विसरू नका’

या कार्यक्रमादरम्यान शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहनही रहाणेनं केले. तसेच, “आपल्या ताटात जे अन्न येते ते शेतकऱ्यांमुळे. शेतकरी अहोरात्र मेहनत करताता त्यानंतर आपल्याला दोन घास खायला मिळतात. मी हॉटेलमध्ये किंवा घरी कुठेही असेन तेव्हा मला जाणीव असते की शेतकऱ्यामुळं मला अन्न मिळत आहे”, असे सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Nov 5, 2019 12:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...