मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

दक्षिण आफ्रिकेच्या ऑलराऊंडरने भारतासमोर हात जोडले, म्हणाला भविष्यासाठी...

दक्षिण आफ्रिकेच्या ऑलराऊंडरने भारतासमोर हात जोडले, म्हणाला भविष्यासाठी...

टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा अडचणीत (India tour of South Africa) सापडला आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे (Corona Variant) जगाची चिंता वाढवली आहे.

  • Published by:  Shreyas

जोहान्सबर्ग, 27 नोव्हेंबर : टीम इंडियाचा दक्षिण आफ्रिका दौरा अडचणीत (India tour of South Africa) सापडला आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे (Corona Variant) जगाची चिंता वाढवली आहे. त्यातच नेदरलँड्सने अर्ध्यातच दक्षिण आफ्रिकेचा दौरा स्थगित करण्याचा निर्णय घेतला आहे. पुढच्या महिन्यामध्ये टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेच्या दौऱ्यावर जाणार आहे. 17 डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात टीम इंडिया 3 टेस्ट, 3 वनडे आणि 4 टी-20 मॅचची सीरिज खेळणार आहे, पण कोरोनामुळे हा दौरा संकटात सापडला आहे. त्यातच आता दक्षिण आफ्रिकेचा ऑलराऊंडर फरहान बहारदिनने (Farhaan Behardien) भारताने हा दौरा रद्द करू नये म्हणून विनंती केली आहे. हा दौरा दक्षिण आफ्रिकेच्या पुढच्या पिढीसाठी अत्यंत गरजेचा आहे, असं ट्वीट बहारदिनने केलं आहे.

india vs south africa, indian cricket team, bcci, corona virus, Farhan Behardien

कोरोना व्हायरसच्या नव्या व्हेरियंटमुळे भारतीय टीमचा पुढच्या महिन्यातला दौरा रद्द होणार नाही, अशी आशा आहे. कारण आमच्या देशाच्या तरुण क्रिकेटपटूंसाठी ही सीरिज खूप गरजेची आहे, असं बहारदिन त्याच्या ट्वीटमध्ये म्हणाला. दुसरीकडे दौऱ्याबाबतचा निर्णय सरकारच्या सल्ल्यानंतरच घेतला जाईल, असं बीसीसीआयने सांगितलं आहे.

दक्षिण आफ्रिकेत सापडलेल्या बी.1.1.529 या कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे जगभरात भीतीचं वातावरण आहे. दौरा झाला तर खेळाडूंना मुंबईहून जोहान्सबर्गला चार्टर विमानाने पाठवलं जाईल, पण बदललेल्या परिस्थितीमुळे त्यांना 3 ते 4 दिवस क्वारंटाईन व्हायला लागण्याची शक्यता आहे, अशी प्रतिक्रिया बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने दिली.

First published: