‘धोनीनं तर मुलीला...’, विराट कोहलीच्या त्या निर्णयामुळे भडकले चाहते

‘धोनीनं तर मुलीला...’, विराट कोहलीच्या त्या निर्णयामुळे भडकले चाहते

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीनं या कारणामुळे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून पहिल्या टेस्टनंतर परत भारतात येणार असल्याचे सांगितले आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 नोव्हेंबर : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरून (India vs Australia) पहिल्या टेस्टनंतर परत भारतात येणार आहे. बीसीसीआयने यासंदर्भात अधिकृत माहिती दिली असून पत्नी अनुष्का शर्माला (Anushka Sharma Pregnancy) बाळ होणार असल्यानं विराट कोहली या कालखंडात अधिकृत पॅटर्निटी लीव्ह घेऊन भारतात येणार आहे. आपल्या पत्नीबरोबर राहण्यासाठी वनडे आणि टी -20 मालिकेतील सहभागानंतर कोहली पहिली टेस्ट खेळणार आहे. त्यानंतर उर्वरित तीन कसोटी सामन्यांमध्ये तो खेळणार नाही.

विराट कोहलीने यासंदर्भात बीसीसीआयला माहिती दिली असून अडलेड टेस्टनंतर तो भारतात परत येणार आहे. यासाठी त्याला बोर्डाने पॅटर्निटी लिव्ह मान्य केली असून बीसीसीआयने प्रेसनोटमधून ही माहिती दिली आहे. विराट कोहलीला पाठिंबा देणाऱ्या चाहत्यांनी आपल्या कुटुंबाला महत्त्व देणाऱ्या खेळाडूचं कौतुक केल आहे. पण त्याचबरोबर काही नेटिझन्सने भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीशी विराटची तुलना करून त्याच्या पॅटर्निटी लिव्हबद्दल प्रश्न विचारले आहेत.

वाचा-IND vs AUS : इरफान पठाण म्हणतो, 'विराटच्या अनुपस्थितीमध्ये याला करा कर्णधार'

कॉमेंट्रेटर हर्षा भोगले यांनी ट्विट करत विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ अडचणीत सापडेल असं म्हटले आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलंय, पहिल्या अडलेड टेस्टनंतर विराट कोहली पुन्हा भारतात परत येणार आहे. नव्या पिढीतल्या खेळाडूंना आपल्या खेळापेक्षा आणि प्रोफेशनल करिअरपेक्षा खासगी आयुष्य महत्त्वाचं वाटतंय. परंतु विराट कोहलीच्या अनुपस्थितीत भारतीय संघ अडचणीत सापडण्याची शक्यता देखील आहे.

मात्र विराट कोहलीच्या या निर्णयानंतर सोशल मीडियावरून त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. तो संघाचा कर्णधार असताना ऑस्ट्रेलियासारख्या महत्त्वाच्या दौऱ्यात थांबण्याऐवजी त्याने भारतीय संघाऐवजी खासगी आयुष्यातील कामाला महत्त्व दिल्याने त्याच्यावर टीका होत आहे.

वाचा-मुलीच्या जन्माने नशीबच बदललं, दोन दिवसांमध्येच भारतीय टीममध्ये निवड

वाचा-रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाला जाणार, फक्त एकच फॉरमॅट खेळणार

सोशल मीडियावर अनेकजण 2015 मधील महेंद्रसिंह धोनी याचं उदाहरण देत आहेत. 2015 च्या वर्ल्ड कपवेळी धोनीची पत्नी साक्षी गरोदर होती. त्यांची मुलगी झिवा जन्मली तेव्हा धोनीनं मुलीला पाहिलंही नव्हतं. त्याने आपल्या देशाला महत्त्व देत मुलीच्या जन्मावेळी भारतात न येण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे कोहलीच्या या निर्णयावर अधिक टीका होत आहे.

एकीकडे नेटिझन्स टीका करत आहेत तर दुसरीकडे अनेकांनी विराटने कुटुंबाला प्राधान्य दिल्याबद्दल त्याची पाठराखणही केली आहे. त्याचबरोबर अनेकांनी ही प्रत्येकाची चॉईस असल्याचे म्हटलं आहे. एकानी म्हटलंय, जगभरातील क्रिकेटपटू पॅटर्निटी लिव्ह घेतात त्यामुळे विराटनी घेणं चुकीचं नाही. त्याची धोनीशी तुलना योग्य नाही.

Published by: Priyanka Gawde
First published: November 11, 2020, 9:36 AM IST

ताज्या बातम्या