मराठी बातम्या /बातम्या /स्पोर्ट्स /

Ind vs NZ: फॅन्स खुश हुए...! 'या' दोन खेळाडूंना अखेर टीम इंडियात संधी, सोशल मीडियात चाहत्यांचं सेलिब्रेशन

Ind vs NZ: फॅन्स खुश हुए...! 'या' दोन खेळाडूंना अखेर टीम इंडियात संधी, सोशल मीडियात चाहत्यांचं सेलिब्रेशन

संजू-उमरानला संधी, चाहते खुश

संजू-उमरानला संधी, चाहते खुश

Ind vs NZ: संजू सॅमसन आणि उमरान मलिकचा ऑकलंडच्या पहिल्या वन डेत प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांना खेळवण्याची सातत्यानं मागणी होत होती. दोघांना संघात स्थान मिळाल्यानं चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

पुढे वाचा ...
  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Siddhesh Kanase

ऑकलंड, 25 नोव्हेंबर: टीम इंडियाचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिक आणि विकेट किपर बॅट्समन संजू सॅमसनला अखेर भारतीय संघात जागा मिळाली आहे. ऑकलंडच्या पहिल्या वन डेत या दोघांचा प्लेईंग इलेव्हनमध्ये समावेश करण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून या दोघांना खेळवण्याची सातत्यानं मागणी होत होती. सोशल मीडियातही या दोघांच्या समावेशावरुन अनेक चर्चा रंगल्या. अखेर या दोघांना संघात स्थान मिळाल्यानं सोशल मीडियात चाहत्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे.

संजू-उमरानला संधी, चाहते खुश

उमरान मलिकला पहिल्यांदाच वन डे खेळण्याची संधी मिळाली आहे. तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या वन डे मालिकेनंतर संजू सॅमसन पुन्हा टीम इंडियासाठी खेळताना दिसत आहे. यावर सोशल मीडियात चाहत्यांनी अनेक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

सनरायझर्स हैदराबादकडून उमरानला शुभेच्छा

आयपीएलमध्ये उमरान मलिक सनरायझर्स हैदराबाद फ्रँचायझीकडून खेळतो. त्यामुळे सनरायझर्सनही त्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

हेही वाचा - Mumbai Indians: मुंबई इंडियन्स 'पलटन'साठी गुड न्यूज! IPL च्या आधी 'तो' परत आलाय

उमरान मलिकनं याआधी भारकडून टीम20 पदार्पण केलं होतं. आणि आता टीम इंडियाच्या वन डे संघातही त्याला जागा मिळाली आहे. तर संजू सॅमसननं आतापर्यंत 10 वन डे खेळळ्या आहेत.

First published:

Tags: Shikhar dhawan, Sports, Team india